navneet rana 
विदर्भ

अमरावतीत खळबळ! खासदार नवनीत राणा पॉझिटिव्ह!

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील सुमारे दहा सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यावर आता खासदार नवनीत राणा यांचा आज रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमधील अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिका-यांनी सांगितले. त्यामुळे अमरावतीत चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा शक्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी मात्र आपल्यापर्यंत हा अहवाल पोहोचला नसल्याचे सांगितले. त्यामुळे नवनीत राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्ताला प्रशासकीय स्तरावरून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या सुमारे 55 जणांच्या घशातील स्वॅब घेण्यात आले होते. त्यात आमदारांच्या वडिलांचा अहवाल रविवारी, २ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आईचासुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, कुटुंबातील व निकटवर्तीय अशा एकूण आठ सदस्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती. आई, वडील, बहीण, जावई, पुतण्या, दोन भाच्या, दोन मुले व एका अंगरक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कुटुंबातील दहा सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांचा सांभाळ करण्यात खासदार नवनीत राणा व्यस्त होत्या. चार दिवसांपूर्वी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रवी राणा यांच्या आई-वडिलांवर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवी राणा नागपूरला असून कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेण्यासाठी खासदार नवनीत राणा या अमरावतीतच होत्या.

आज नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली. रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट व थ्रोट स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये खासदार नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संपर्कात आलेल्यांचीसुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन नवनीत राणा व रवी राणा यांच्या वतीने करण्यात आले. दरम्यान, रॅपिड टेस्टमध्ये खासदार नवनीत राणा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताला रवी राणा यांचे बंधू सुनील राणा यांनी दुजोरा दिला.

सविस्तर वाचा - कोरोनामुळे त्या पोलिसाचा मृत्यू?

नागपूरच्या रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून दाखल आई-वडिलांसोबत असलेल्या आमदार रवी राणा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे तसेच ताप व खोकला आल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी होणार असल्याचे रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT