Navneet Rana was threatened by MP political news 
विदर्भ

नवनीत राणा यांना चक्क खासदाराने दिली धमकी; आरोप करताना काय म्हणाल्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नवनीत राणा या विदर्भातील अमरावतीच्या खासदार... त्या आपल्या कार्यामुळे नेहमी चर्चेत असतात. वेगवेगळे विधान करण्यापासून समाजकार्यात त्या नेहमी आघाडीवर असतात. महिलांपासून युवावर्गात त्या चांगल्याच प्रसिद्ध आहे. मागे त्यांना ‘ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते तो चेहरा ॲसिड टाकून विद्रूप करून टाकू’ अशी धमकी मिळाली होती. या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली होती. आता एका खासदाराकडूनच धमकी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून शिवसेना हवेत गेली आहे. त्यांना वाट्टेल तसे ते वागत आहे. कुणालाही जेलमध्ये टाकत आहेत. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. परमबीर सिंग, मनसुख हिरेन प्रकरणावरून हे सिद्ध होते. मी यांचे काळे धंदे सभागृहासमोर मांडत असल्यामुळे गुंदागर्दी सुरू केली आहे. आज तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हद्दच केली. माझ्या बाजूंनी जाताना त्यांनी मला धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यापूर्वीही शिवसेनेकडून मला ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचे त्यांनी सांगितले. आतातर अरविंद सावंत यांनी मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. ‘आता तुम्हाला जेलमध्ये टाकणार, तुमचे बाहेर फिरणे मुश्‍कील करून टाकू’ अशी धमकी दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी सोमवारी केला.

सभागृहाच्या बाहेर वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. परंतु, त्यांच्या धमक्यांना मी घाबरले नाही, असेही त्या म्हणाल्या. तसेच महिला खासदाराला सभागृहाच्या आत अशाप्रकारे धमकावणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मागे मिळाले होते धमकीचे पत्र

आठ फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर मी बोलत होती. ठाकरे सरकारच्या कामांची माहिती संसदेत देत होती. दुसऱ्याच दिवशी मला पत्र मिळाले होते. त्या पत्रात ‘ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते, तो चेहरा ॲसिड टाकून विद्रूप करून टाकू’, अशी धमकी लिहिली होती. तुम्हाला फिरण्याच्या लायकीचे सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा पत्रातून देण्यात आली होती.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : बाईकला धडकून स्लीपर बस पेटली, २० जण जिवंत जळाले; ४० जण करत होते प्रवास...

Neglect of Tribals : आदिवासींकडे नेहमीच दुर्लक्ष होतय का? वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रसूतीत बालकाचा मृत्यू

Panchang 24 October 2025: आजच्या दिवशी ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Leopard Falls Into Well : शिकार करायला गेला अन् शिकारी झाला! रत्नागिरीत बिबट्या विहिरीत पडल्याचा थरारक प्रकार

Chitrakoot Deepdan Festival: चित्रकूटमध्ये अलौकिक दिवाळी: मंदाकिनीच्या किनाऱ्यावर दीपदान, ५ दिवस भरते गाढवांची जत्रा

SCROLL FOR NEXT