विदर्भ

नक्षलविरोधातील अभियानामुळेच पोलिस बेसावध

सकाळवृत्तसेवा

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानाला गेल्या काही वर्षांत मिळालेले यशामुळेच पोलिस अधिक बेसावध झाले. यातून कुरखेडा उपविभागात गेल्या काही वर्षांत एकही मोठी घटना नक्षलवाद्यांनी घडवून आणली नाही. त्यामुळे या परिसरातून ते बेपत्ता झाले, असा समाज करून अनेक जवानांचा खासगी कामांसाठी बाहेर पडत असत, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये कोंबडा बाजाराला उपस्थिती, विनापरवानगीने दारूविक्रेत्यांकडे कारवाईसाठी जाणे असे प्रकार नित्याचे झाले होते, अशी चर्चा नागरिकांत ऐकायला मिळत आहे. 30 एप्रिलच्या मध्यरात्री दीडशेहून अधिक नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्‍यातील दादापूर (रामगड) येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल 27 वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी साडेअकराच्या सुमारास नक्षल्यांनी जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडविला. यात पुराडा व त्यानंतर दादापूरकडे रवाना होणाऱ्या जलद प्रतिसाद पथकातील 15 जवान आणि खासगी वाहनचालक शहीद झाले. साधारणतः जाळपोळ केल्यानंतर पोलिस पंचनामा करण्यासाठी येणार म्हणून नक्षली वाटेत भूसुरुंग पेरून नंतर त्याचा स्फोट घडवून आणतात. बऱ्याच घटनांमध्ये असा अनुभव पोलिसांना आला आहे. त्यामुळे दादापूर येथील जाळपोळीचा संबंध जांभूरखेड्याच्या भूसुरुंग स्फोटाशी जोडला जात आहे.
नक्षली आपली चळवळ चालविण्यासाठी तेंदू कंत्राटदार, बांबू खरेदी व वाहतूक करणारे कंत्राटदार आणि पेपरमिल तसेच अन्य तत्सम लोकांकडून खंडणी वसूल करतात. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून पेपरमिलवाल्यांनी बांबू खरेदी बंद केल्याने नक्षल्यांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे रस्ते आणि पूल बांधकाम करणारे कंत्राटदार यांना नक्षल्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून लक्ष्य केले. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर महामार्ग, अन्य रस्ते व पुलांची कामे मंजूर झाली आहेत. यातील अनेक कामे दुर्गम भागात असल्याने कंत्राटदार वा संबंधित कंपन्या नक्षल्यांशी देवाणघेवाण करून आपली कामे करतात हे आजवर लपून राहिले नाही.
वाहतूक पोलिसांवर दबाव
जांभूरखेडा येथे जाण्यासाठी तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या एका कर्मचाऱ्याला भ्रमणध्वनी करून वाहन तत्काळ उपलब्ध करून देण्याचे फर्मान सोडले होते. या वेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी वाहन उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. यावरून अधिकाऱ्याने त्याच्यावर प्रचंड दबाव टाकला. कोणतेही खासगी वाहने उपलब्ध करून द्या, कारण सांगू नका असे सुनावले होते. त्यामुळे वरिष्ठांच्या कारवाईच्या भीतीने वाहतूक पोलिस नेहमीप्रमाणे जवानांना अभियानासाठी दादापूर येथे जाण्यासाठी खासगी वाहन उपलब्ध करून देत होते, अशीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT