Naxals killed both of them
Naxals killed both of them Naxals killed both of them
विदर्भ

नक्षलवाद्यांना आला खबरी असल्याच्या संशय; घरातून नेत केला दोघांचा खून

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली : जिल्ह्यातील लोहखनिज प्रकल्प सुरजागड येथे नक्षलवाद्यांनी (Naxals) पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून दोघांचा दगडाने डोके ठेचून खून (killed) केला. ही घटना गुरुवारी (ता. १४) उघडकीस आली. सुरजागड परिसरात मोठ्या संख्येने नक्षलविरोधी तुकड्या पाठवून नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंगेश मासा हिचामी (२७, रा. झारेवाडा पो. गट्टा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्मसमर्पित नक्षली नवीन ऊर्फ अशोक पेका नरोटी (२५, रा. गोरगुट्टा, पो. गट्टा (जां.), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) याचा गोलगट्टा येथे दगडाने डोके ठेचून नक्षलवाद्यांनी खून (killed) केला. या दोन्ही घटना पोलिस मदत केंद्र गट्टा (जां.) हद्दीत बुधवारी घडली. घटनेची माहिती पोलिस विभागाला मिळताच सुरजागड परिसरात मोठ्या संख्येने नक्षलविरोधी तुकड्या पाठवून नक्षलविरोधी अभियान तीव्र केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

रस्त्यावर आणून ठेवला मृतदेह

मंगेश हिचामी याला बुधवारी रात्री १० वाजता व नवीन नरोटे याला रात्री एक वाजता नक्षलवादी घरातून बळजबरीने घेऊन गेले व खून (killed) केला. मंगेश हिचामी याचा मृतदेह झारेवाडा-गट्टा मार्गावर आणून ठेवला, तर नवीन नरोटे याचा मृतदेह गोरगुट्टा-गिलनगुडा मार्गावर आणून ठेवला होता.

नक्षल्यांनी भयाण अस्तित्व पुन्हा दाखविले

बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुरजागड लोहखनिज प्रकल्पात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला होता. कार्यक्रमाला २४ तासांचा कालावधी उलटत नाही तोच नक्षल्यांनी (Naxals) दोघांचा खून करून आपले भयाण अस्तित्व पुन्हा दाखविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

SCROLL FOR NEXT