राजू कारेमोरे राजू कारेमोरे
विदर्भ

राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक

सकाळ डिजिटल टीम

भंडारा : जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांना सोमवारी (ता. ३) भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (ता. ३१) रात्री मोहाडी पोलिस ठाण्यामध्‍ये त्यांनी राडा घातला पोलिसांना शिवीगाळ केली होती. तसेच व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि ५० लाख चोरी केल्याचा आरोप राजू कारेमोरे यांनी लावला होता. सोमवारी त्यांना घरातून भंडारा पोलिसांनी अटक केले.

आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलिस ठाणे गाठून पोलिस ठाण्यातच धिगांणा घातला होता. आमदारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. राजू कारेमोरे यांचे व्यापारी मित्र आमदारांच्या घरून ५० लाखांची रोकड घेऊन तुमसरकडे जात होते.

पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही? म्हणून गाडी थांबवली. यावेळी यासीम छवारे, अविनाश पटले आणि पोलिस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पटले आणि छवारे यांच्याजवळील ५० लाखांची रोख रक्कम आणि सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार यासीम छावारे यांनी मोहाडी पोलिसात दिली होती. बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक राणे यांनी देखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी माफी देखील मागितली होती. मात्र, सोमवारी त्यांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Liquor Ban: मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह 'या' दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

SCROLL FOR NEXT