Sharad Pawar 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : तरुण पिढीला हवाय बदल : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : गुजरातचे आदेश पाळायचे, त्यांच्या साईचे निर्णय घ्यायचे असा सपाटा राज्यशासनाने लावला आहे. यांचा परिणाम राज्यातील रोजगारावर झाला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतीचे प्रश्‍न वाढत असल्याने तरुण वर्गात मोठा असंतोष दिसत असून तरुण पिढीला बदल हवाय असेच चित्र सध्या राज्यात दिसत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

गुजरात गुंतवणूक करण्यात कसे सोईचे आहे असे चित्र केंद्राकडून भासवले जात आहे. अहमदाबाद-मुबंई या बुलेट ट्रेनची मागणी कुणीही केली नसताना हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यापेक्षा दिल्ली-मुबंई-नागपूर असा प्रकल्प हाती घेतला असता तर विदर्भ,मराठवाडा अशा राज्यातील सर्वच भागाला त्यांचा लाभ मिळाला असता. रोजगार निर्मीती झाली असती. मात्र, सत्ताधार्‍यांना तसे करायचे आहे असे दिसत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काळात सुरू झालेले कारखाने या सरकारच्या काळात बंद पडले आहेत. जे सुरू आहे त्यातील कामगार काढले जात आहे. राज्य आणि देशाला संकटात नेणार्‍यांना सत्ताधार्‍यांना खाली खेचू असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. यात आम्हाला युवकांची मोठी साथ मिळत असून युवकांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरलेल्यांना तरुण पिढी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : ४०००० कोटींचे उत्पन्न... ७० लाख नोकऱ्या, गडकरींनी दिलेला कमाईचा मंत्र काय आहे?

Latest Marathi News Updates : रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी रेखाटून प्रशासनाचा निषेध

Viral: वजन कमी करा आणि पैसे मिळवा... प्रसिद्ध कंपनीची अनोखी ऑफर, १८ किलो वजन कमी करणाऱ्याला २,४६,८४५ रुपये दिले

Marriage Registration Issue : सहा महिन्यांपासून विवाह नोंदणी पोर्टल ठप्प; हजारो विवाहांची नोंदणी रखडली

Asia Cup 2025: भारत - पाकिस्तान सामन्यावर BCCI चा 'अदृश्य बहिष्कार'? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT