attention to the body.jpg 
विदर्भ

अरे बापरे! लाॅकडाउनमुळे सुटलं पोट, आरोग्य होतंय डाऊन...हे करा उपाय

सकाळ वृत्तसेवा

अकोला : संचारबंदी असल्यामुळे प्रत्येकाच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद आहेत. घरबसल्या विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जात आहेत. त्या फर्माइशींवर ताव मारला जात आहे. खाण्या-पिण्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे शरीर जड होत असून, लठ्ठपणा वाढला असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लॉकडाऊनमध्ये आहाराबरोबर शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे.

संपूर्ण देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे अकोलकर दीड महिन्यांपासून घरांमध्ये बंदिस्त आहेत. शहरातील बहुतांश कार्यालये तसेच दुकाने बंद आहेत. नाईलाजाने सर्वजण आपापल्या घरांमध्ये कोंडले गेलेत. घराबाहेर पडत नाहीत.

निवांत बसणे हेच काम सुरू आहे. एकीकडे व्यायामाचा अभाव अन् त्याचवेळी खाण्या-पिण्यावरील नियंत्रण सुटत आहे. विविध चटकदार पदार्थ खाण्यावर भर दिला जात आहे. जेवणाच्या वेळाही वाढल्या आहेत. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेड मिळत आहे. तसेच, कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकताे.

प्राेटीनयुक्त आहार घ्या
लाॅकडाऊन काळात शरीराच्या हालचाली कमी झाल्या आहेत. त्यात आहारात कार्बाेहायड्रेड कंटेन्टचा वापर अधिक असताे. अशा परिस्थितीत प्राेटीनयुक्त पदार्थांचा आहारात वापर वाढवणे गरजेचे असते. आहारात सर्व प्रकारच्या डाळी, अंडी याचा वापर केल्यास प्राेटीन मिळते. घराबाहेर जाता येत नसले तरी सकाळी घरातच व्यायाम करणे व दरराेज जेवण झाल्यानंतर घराचा जीना किमान चार वेळा चढउतार केला तरी अधिक फायदेशिर ठरेल.

लॉकडाऊनमध्ये करा नियमित व्यायाम
गेल्या दीड महिन्यापासून काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी लाॅकडाऊन सुरू असल्यामुळे सर्वच कर्मचारी घरी आहेत. कोरोनाची भीती, नोकरी राहील की नाही याचे टेन्शन आहे. घरी असल्यामुळे वारंवार खाण्यावर दिवसभरात भर दिला जात आहे. शारीरिक हालचाल होत नसल्याने बद्धकोष्ठता वाढते, पोटचा घेरही वाढतो. त्यात व्यायामाचा अभाव व खाण्यापिण्यावर नियंत्रण नसल्यामुळेच लठ्ठपणा व वजन वाढवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.

शक्य असेल तेव्हा शरीराची हालचाल करणे गरजेचे
टाळेबंदी म्हणजे स्टॉप डाऊन मुळीच नव्हे. त्यामुळे शक्य असेल तेव्हा शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे. यासाठी नियमित व्यायाम बागकाम, टेरेसवर फेऱ्या मारणे आधी प्रयोग करून शरीराची हालचाल करता येऊ शकते. यामुळे टाळेबंदीतही आपले आरोग्य आबाधित राहण्यास मदत होते.
-डॉ. सुभाषचंद्र कोरपे, पचन संस्थेचे सर्जन आणि दुर्बिण परीक्षक, अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT