Nest 
विदर्भ

सुगरणीचा खोपा म्हणजे निसर्गातील उत्कृष्ट कारागिरीचा नमुनाच... 

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : इवलीशी चोच अन्‌ पायांची दोन बोटं. मात्र, कारागिरी एवढी की मनाला अचंबा वाटावा. होय, चिमणी एवढ्या सुगरण पक्षाच्या घरट्याची ही गोष्ट. निसर्गात आपण अनेक चमत्कार बघतो. सुगरणीचा खोपा हा निसर्गातील उत्कृष्ट कारागिरीचा नमुना आहे. तालुक्‍यातील पंजावाडी शिवारात काटेरी बाभळीच्या झाडाच्या फांद्यांना टांगलेले एक नाही, तर अनेक सुगरणीचे घरटे पाहून गावकरीही थक्क झाले आहेत. सुगरणीच्या घरटे बांधणीच्या कलेला निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या तरल प्रतिभेने अतिशय यथार्थपणे काव्यबद्ध केले आहे. 

"अरे खोप्यामध्ये खोपा 
सुगरणीचा चांगला 
देखा पिलासाठी तिनं 
झोका झाडाले टांगला" 

गळा आणि पोटावर पिवळ्या रंगाची उधळण केलेला सुगरण पक्षी नदीकाठच्या जंगल शिवारात पाहावयास मिळतो. नाजूक वीण असलेली मजबूत व देखणी घरटी, ही सुगरणची खरी ओळख आहे. त्याची विणकामाची कलात्मकता पाहताना मनाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. साधारणतः पावसाआधी जून महिन्यात नर पक्ष्यांची घरटे विणण्याची लगबग सुरू होते. जून ते ऑगस्ट हा त्यांच्या विणीचा हंगाम असतो.

मजबूत फांदीच्या टोकाला गवताच्या काडीने खोप्याची पहिली गाठ मारताना सुगरणचे खरे टॅलेंट दिसून येते. नर काही दिवसांतच गवत व शिंदीच्या नरम बारीक काड्यांपासून सुंदर घरटे तयार करतो. घरट्याचा आकार व रूप मोहक असते. घरटे पूर्ण झाल्यावर मादी सुगरण आधी घर न्याहाळते. ते पसंत आल्यासच ती थांबते. मात्र, मादी सुगरणला काहीवेळा घरटे न आवडल्यास नर पक्षी ते मोडून टाकतो व पुन्हा नवे आकर्षक घरटे तयार करतो. 

शत्रू पक्षी व सापांपासून संरक्षण व्हावे म्हणून साधारणतः काटेरी बाभळीच्या वा उंच झाडावर सुगरण घरटे तयार करते. काही लांबोळे तर काही छोटे खोपे फांदीच्या टोकास लटकलेले असतात. वाऱ्यावर झुलताना आकाशात पाळणा टांगावा, असा भास होतो. बऱ्याचदा सुगरणींच्या घरट्यांची मोठी वसाहत पाहावयास मिळते. अगदी वादळ-पावसात सुगरणीची घरटी अर्थात खोपे फांदीला घट्ट बांधले असल्याने सुरक्षित राहतात. सुगरणीची घरटे बांधण्याची कला अचंबित करते. जणू काही सुगरण म्हणजे पक्षी जगतातील अभियंताच होय! 

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची निरीक्षणशक्ती व सूक्ष्मदृष्टी अचाट होती. निसर्गाच्या प्रकोपात मजबूत इमारती व पुल पत्त्यासारख्या कोसळताना पाहताना बहिणाबाईंच्या सुगरण कवितेतील ओळी सहज ओठावर येतात. 

"उलूशीच चोच 
तेच दात तेच ओठ 
तुला देले रे देवाने 
दोन हात, दहा बोटं" 

चिमुकल्या सुगरण पक्षाचे वर्णन करताना बहिणाबाईंनी माणसाच्या क्रियाशील शक्तीकडे बोट दाखविले आहे. सुगरणीचा हा संदेश माणूस कधी अंगीकार करेल का, हा प्रश्‍नच आहे.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT