ghani
ghani 
विदर्भ

उच्चशिक्षित अभियंता तरुणाचा नवा प्रयोग! शेतकऱ्यांना करतोय आत्मनिर्भर

सूरज पाटील

यवतमाळ : पूर्वी बैलाला घाणीला जुंपून तेलबियातून तेल काढले जायचे. पुढे रिफाइंड तेलाची एंट्री झाली आणि लाकडी घाणीचे तेल इतिहास जमा झाले. मात्र उच्चशिक्षित तरुणाने पुन्हा एकदा जुने ते सोने या न्यायाने घाणीच्या तेलाची नव्याने सुरुवात केली आहे. आपल्या शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, या जाणिवेतून अभियंता तरुणाने शेतकऱ्यांचा स्वयंसहाय्यता गट स्थापन करून तेलघाणीच्या निर्मितीला सुरुवात केली. त्याने पारंपरिक तेलघाणीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. शेतकऱ्यांच्या तेलबिया उत्पन्नाला यातून प्रोत्साहन मिळत असून, अभियंता तरुणासह शेतकरी "आत्मनिर्भर झाले आहे.

शुभम दिवाकर दिघाडे, असे तरुणाचे नाव असून, त्याने अभियांत्रिकीची (प्रोडक्‍शन) पदवी घेतली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, या विचारातून शुभमने तेलघाणीचा व्यवसाय निवडला. कृषीविभागाच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांचा स्वयंसहाय्यता गट स्थापन केला. बॅंकेकडून कोणतेही कर्ज न घेता राधानगरी येथे प्लॅन्ट सुरू केला.

घाटंजी, बाभूळगावसह ज्या तालुक्‍यात सर्वाधिक भुईमूंग, तिळ, जवस उत्पन्न शेतकरी घेतात. त्यांच्याकडून थेट तेलबियांची खरेदी केली जाते. यात मध्यस्थ नसल्याने शेतकरी नागवला जात नाही. भावात कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही. त्यामुळे शेतकरीदेखील थेट तेलबिया विक्रीला प्राधान्य देतात. आरोग्यासाठी हितकारक असलेल्या तेलाला पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती येथे चांगली मागणी आहे. थेट ग्राहकांना तेल उपलब्ध करून दिले जाते. घाणीतून शेंगदाणा, जवस, तीळ, बदाम, खोबरे आदी प्रकारच्या तेलाची निर्मिती केली जाते. एक किलो तेलासाठी अडीच ते तीन किलो शेंगदाणा लागतो. वेस्ट मटेरियलमधून ढेप बनविली जाते. ही ढेप दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाते.

घाणीचे तेल फायदेशीर
झिरो वेस्ट प्रोडक्‍शन आहे. लाकडी घाणीचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पूर्णपणे नैसर्गिक शास्त्रोक्त पद्घतीने तयार केले जाते. भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाणीचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते. त्यांना कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार होत नव्हते. आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी घाणीचे तेल फायदेशीर आहे.
शुभम दिघाडे,लाकडी घाणी तेल उत्पादक, यवतमाळ.


आरोग्यासाठी वरदान
लाकडी घाण्याचे तेल ४० ते ४५ डिग्री सेल्सिअस तापमानात तयार केले जाते. त्यामुळे या तेलातील नैसर्गिक व शरीराला अत्यावश्‍यक असलेले घटक टिकून राहतात. आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे समजले जाणारे लिपो प्रोटीन फक्त लाकडी घाणीच्या तेलात मिळते. पारंपरिक लाकडी घाणीच्या तेल सेवनामुळे हार्ट अटॅक, ब्लॉकजेस, किडनीचे विकार पॅरालीसीस, सांध्याचे विकार, डायबेटिस, ब्रेन हॅमरेज अशा अनेक विकारापासून सुटका होण्यास मदत होते. यात कोणतेही रासायनिक द्रव्य मिसळले जात नाही.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT