shatavari 
विदर्भ

वेगळी वाट चोखाळणारा प्रयोगशील शेतकरी! जाणून घ्या त्यांचा नवा प्रयोग

राज इंगळे

अचलपूर(जि. अमरावती) : दुष्काळ व नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत अचलपूर येथील एका शेतकऱ्याने शतावरी या वनस्पतीच्या शेतीचा नवा पॅटर्न लागू केला आहे. विशेष म्हणजे अचलपूर तालुक्‍यात पहिल्यांदाच शतावरी पिकाची लागवड करण्यात आली आहे. बाजारपेठेत या वनस्पतीला असलेली मागणी पाहता शेतकऱ्यांना हे पीक फायदेशीर ठरणारे आहे.

अचलपूर तालुका सिंचन व्यवस्थेने सक्षम असून येथील शेतकरी केळी, हळद, सोयाबीन, कापूस या पिकांना पसंती देतात. मात्र दरवर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असून बाजारात कापूस, सोयाबीन या पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत अल्प भाव मिळतो. त्याउलट शतावरीला बारा महिने चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शतावरीची शेती करण्याचा विचार करणे काळाची गरज आहे.

या सर्व बाबीचा विचार करून अचलपूर शहरात वास्तव्यास असणाऱ्या गणेश हिंगणीकर या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत तालुक्‍यात पहिल्यांदा शतावरी या औषधी वनस्पतीच्या पिकाची तीन एकरात लागवड करून नवा पॅटर्न निर्माण केला आहे. ते अल्पावधीतच लाखोंचे उत्पन्न घेत शेती क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करणार आहेत.

शेतीचे योग्य नियोजन केल्यास शेतात पीक लावण्यापासून ते त्याच्या उत्पन्नापर्यंत शास्त्रशुद्ध आणि आधुनिक माहितीच्या आधारे शेती केल्यास ही काळी आई नक्कीच बळीराजाला जगवते आणि शेतकऱ्याचा संसार सुखाने फुलवते, त्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवीन प्रयोग करून पिकांची लागवड करणे गरजेचे झाले आहे.

हिंगणीकर यांनी कित्येकांचा विरोध झुगारून नवीन प्रयोग करण्याच्या हेतूने विश्वास पेरून आत्मविश्वास उगविण्याचे काम केले. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर केवळ १८ महिन्यात तब्बल एकरी १० लाख रुपयांचे उत्पन्नही अपेक्षित आहे.

तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचे दुष्टचक्र अनुभवले आहे. मात्र याच मातीत शतावरीची पेरणी करून गणेश हिंगणीकर यांनी सोने उगविण्याची किमया करून दाखवली आहे. शतावरी ही औषधी वनस्पती असून मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यातून चांगले उत्पन्न मिळते. असे गणेश हिंगणीकर यांना समजले. त्यानंतर त्यांनी शतावरी लागवडीची माहिती घेऊन नियोजन केले व लागवड केली. अठरा महिन्यानंतर त्यांचे पीक काढणीला येणार आहे. या शतावरी पिकातून त्यांना अठरा महिन्यात तब्बल एकरी दहा लाख रुपयांचे उत्पन्न होणे अपेक्षित आहे.

नवीन प्रयोग
मान्सून आणि पाणी हे दोन्ही घटक शेतीसाठी महत्त्वाचे ठरतात. मात्र तरीही काळानुसार माणसाने शेतीत, पिकात आणि शेतीच्या मशागतीतही बदल करायला हवा. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत नवनवीन प्रयोग करत मातीशी जोडलेलं नातं बळीराजाच्या कुटुंबात समृद्धी आणेल, त्यासाठी रिक्‍स घ्यावी लागेल.
गणेश हिंगणीकर, शेतकरी, अचलपूर

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT