A new method of begging in Amravati 
विदर्भ

‘मुलाचा अपघात झाला, किती जखम झाली, पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही’; भीक मागण्याची नवी पद्धत

संतोष ताकपिरे

अमरावती : साध्या-सरळ लोकांकडून जाणून-बुजून पैसे लुबाडण्याचे अनेक किस्से आपण रोजच ऐकत वा वाचत असतो. कोणी खोट बोलून, कोणी मदत म्हणून तर कोणी धमकी बजा इशारा देऊन पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करतात. कोणी साधूचा वेषात हातात देव घेत घरोघरो पैसे मागण्यासाठी जातात. यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, अमरावती जिल्ह्यात घडलेला किस्सा काही ओरच आहे. चला तर जाणून घेऊया...

कोरोना व लॉकडाउनमुळे तसेही नागरिक कमीच घराबाहेर पडत आहेत. कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत असल्याने सावधान राहण्यासाठी नागरिकांनी घेतलेला हा निर्णय आहे. त्याच्या या निर्णयामुळे भिक्षेकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कोणीही भीक देत नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे मिळेल तिथून पैसे गोळा करण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे.

दिवस शनिवार... अमरावतीचा मालडेकडी रोड... मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मार्गाने एक युवती दुपारच्या सुमारास आईसोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाली... वाटेत अचानक एक जखमी मुलगा त्यांच्या दुचाकीसमोर येऊन झोपला. हे काय होत आहे ते माय-लेकींना समजलेच नाही. अवघ्या पाच मिनिटात भटक्या जमातीच्या २५ ते ३० महिला आणि पुरुषांनी दुचाकीस्वार युवतीला घेरले. त्यामुळे युवती व तिची आई घाबरली.

काही सेकंदातच लोकांनी युवती व तिच्या आईला घेरले. काही कळायचा आत त्यांनी ‘मुलाचा अपघात झाला. त्याला किती जखम झाली.’ अस म्हणत पैसे मागायला सुरुवात केली. पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे ते भयभीत झाले. त्या ठिकाणी उपस्थित परिसरातील लोकांपैकी कुणाचीही युवतीला घेरणाऱ्या लोकांची समजूत काढण्याची हिंमत होत नव्हती.

कोणीतरी तातडीने शहर कोतवाली पोलिस ठाणे आणि नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. सीआर व्हॅनसह कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर युवती व महिलेला जमावापासून वेगळे करण्यात आले. खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला दूर जाण्यास पोलिसांनी भाग पाडले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Government Nominated Members : गोकुळवर चार शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार; गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती

Nursing Students Drowned : ईश्वरपूरमध्ये विहिरीत बुडून नर्सिंगचा अभ्यास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; जेवणानंतर घडली दुर्दैवी घटना

IND vs NZ 1st ODI Live : विराट कोहलीने इतिहास रचला, वन डे क्रिकेटमध्ये अभूतपूर्व विश्वविक्रम नोंदवला; जगातला पहिलाच फलंदाज...

Latest Marathi News Live Update : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू

''सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही आशीर्वाद द्या, तब्येतीची काळजी घ्या''; PM मोदींचा शरद पवारांना फोन

SCROLL FOR NEXT