newly married couple unalbe to reach native place 
विदर्भ

जावईबापूंचा आंब्याच्या रसाचा पाहुणचार हुकला, नववधू सासरीच लॉकडाउन

सकाळ वृत्तसेवा

नंदोरी (जि. वर्धा ) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन असल्याने अनेक सासुरवाशीनी माहेरापासून दुरावल्या आहेत. यात काही नवविवाहित वधूंचाही समावेश आहे. ज्यांचे विवाह जानेवारी, फेब्रुवारीत झाले त्या माहेरचांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहे. तर काही गरोदर मातांसमोर पेच निर्माण झाला असल्याने सासूबाई सुनबाईच्या प्रसूतीबाबत काळजीत आहे.

लग्नानंतर मुलीचे पहिले बाळंतपण माहेरी करण्याची परंपरा आहे. तर जावईबापूंना उन्हाळ्यात सासरी आंब्याच्या रसाचा पाहुणचार ठरलेला असतो, पण लॉकडाउनमुळे जावईबापूंचा पाहुणचार हुकला आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने काही गरोदर माता सासरी अडकलेल्या आहेत. काही पुणे, मुंबईसह परराज्यातही अडकलेल्या आहेत. त्यांना लॉकडाउनमुळे बाळंतपणासाठी माहेरी-सासरी परत येता येईना. यामुळे गरोदर मातांचे आईवडील संचारबंदीमध्ये आपल्या मुलीला माहेरी कसे आणता येईल, या विवंचनेत आहेत. काही गरोदर माता माहेरी जाण्याचा अट्टहास करीत आहे. त्यामुळे संचारबंदीत शासकीय परवानगी काढून खासगी वाहनाने अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करून बायकोला माहेरी सोडताना नवऱ्याचीही चांगलीच दमछाक होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने मुख्यतः ज्येष्ठ नागरिक, नवजात बालक तसेच गरोदर मातांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याने या लोकांची विशेष काळजी घेण्याचे सांगितले आहे. खरे पाहता गर्भधारणेच्या कालावधीत महिलांनी आनंदी आणि तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला जातो, परंतु सध्या कोरोनाच्या उच्छादामुळे गरोदर महिलांचा तणाव आणखीच वाढला आहे. नवजात बालकांच्या मातेलाही अनेक निर्बंधाखाली राहावे लागत आहे. नातेवाइकांचे येणे -जाणे यावरही बंधने घालण्यात आली आहे. बाळंतपण सुखरूप आणि सुलभ होण्यासाठी गरोदर महिलांना दररोज किमान एक किमी अंतर चालण्यास सांगितले जाते, परंतु कोरोनामुळे गरोदर महिलांना घराच्या बाहेर पडता येत नसल्याने त्यांना व्यायाम करण्यास अडचण येत आहे. गरोदर मातांना अनेकदा तपासणी करण्यासाठी डॉक्‍टरकडे जावे लागते. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे दवाखान्यात गर्दी असल्याने गरोदर माताही धास्तावलेल्या आहे. खबरदारी म्हणून आवश्‍यकता असेल तरच दवाखान्यात या, असे डॉक्‍टर फोन वरून सल्ला देत आहेत.

महिलांनी स्वत:ची काळजी घ्यावी

बाळंतपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून महिलांनी मानसिक तणाव घेऊन घाबरून जाऊ नये, पूर्वीच्या काळी दरमहा तपासणी केली जात नव्हती. त्यामुळे महिलांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. बाहेरची फळे, भाज्या स्वच्छ धुवून खावीत, हलका व्यायाम करणे, दवाखान्यात जाण्याची वेळ असल्यास इतरांशी संपर्क होऊ देऊ नये, डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी करावी, वारंवार स्वच्छ हात धुवावेत, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून दिला जात आहे.

मी लग्नानंतर पतीसोबत नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास गेली. दरम्यान, गरोदर असल्याने माहेरी येऊन गरोदरपणातील डॉक्‍टरकडे नियमित उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत राज्यासह जिल्हा लॉकडाउन असल्याने अत्यंत कठीण परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. मात्र, यात मला माझ्या सासूबाई धीर देत असल्याने मी खंबीरपणे गर्भारपणातील सर्व सोपस्कार जसे व्यायाम, धार्मिक पुस्तकांचे वाचन करीत आहे. मी सध्या सासरी असल्याने निश्‍चिंत आहे.
- मयूरी तेजणे, हिंगणघाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT