News about Hindu culture 'Kande Navmi' 
विदर्भ

कांदेनवमी' साजरी होणार घरच्या घरी, का आली ही वेळ... 

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : हिंदू संस्कृतीत चातुर्मासाला वेगळे महत्त्व आहे. आषाढी शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत या चार महिन्यांत अनेक जण कांदा आणि लसूण वर्ज्य करतात. चातुर्मासाच्या एक दिवस आधी "कांदे नवमी' साजरी करण्यात येते. सोमवार ता. 29 रोजी ही नवमी येत असून, यंदा "कोरोना'मुळे खवय्यांना ती घरातच साजरी करावी लागणार आहे. 

चातुर्मासात अनेक घरात कांद्याला आहारात बंदी घालतात. पावसाळ्याच्या दिवसात कांद्यावर बरेचदा बुरशी येते. कांद्यावरील पापुद्रे काळसर दिसतात. अशा स्थितीत कांदा सेवन पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नसल्याने जुन्या पिढीतील लोक पावसाळ्यात कांद्यापासून दूर राहतात. कोणाच्याही घरातून कांदा व लसणाच्या फोडणीचा घमघमीत वास येणे, अशावेळी दुरापास्त होते. कांदे भजी, कांदे पोहे, कांदे उपमा हे चटकदार पदार्थ चार महिन्यांसाठी बाद होत असल्याने खवय्यांचे भजी प्रेम चातुर्मासा आधी तीव्रतेने उफाळून येते. 

त्यासाठी कांदे नवमीला वाफाळलेल्या चहासोबत कुरकुरीत भजींचा बेत कुटुंबात, क्‍लबमध्ये आखला जातो. आषाढातील कोसळणाऱ्या पाऊसधारा, कुरकुरीत भजींसोबत रंगणाऱ्या गप्पा अशी छान मैफिल कांदे नवमीला रंगत जाते. खवय्यांच्या जिभेवर मग कुरकुरीत भजींचा स्वाद तिखट गोड चटणी बरोबर घुटमळत राहतो. 

यंदा खवय्ये कुरकुरीत भजींच्या सामूहिक कार्यक्रमाला मुकणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सामूहिक पार्टींना परवानगी नसल्याने आता घरातल्या घरातच कांदे भजीचा स्वाद चाखावा लागणार आहे. नेहमीच्या कट्टयावरही कांदी भजी मिळणार नसल्याने खवय्यांना "होम मिनिस्टरां'च्या पाककलेतून तळलेल्या भजींवर ताव मारता येईल. चातुर्मासातील कांद्यांची चव कांदे नवमीला भागविण्याची तयारी सध्या घराघरात सुरू आहे. 

नव्या पिढीला मात्र चातुर्मासात भोजनातील कांदा व लसूण वर्ज्य असणे, मान्य नाही. तरी जुन्या पिढीतील घरातील ज्येष्ठ मंडळी अद्याप यावर ठाम असून कांदे नवमीला जिभेची चव ते भागवून घेतात. कांदे नवमीची दिनादर्शिकेत नोंद पहावयास मिळत नाही. परंतु, एकादशीच्या आधी कांदे नवमीच्या बेताला पुरते उधाण आलेले असते, एवढे नक्की! 
 

सोशल मीडियावर कांदाभजी! 

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळणे आवश्‍यक आहे. अशावेळी पार्टीचा आनंद लुटता येत नाही. अलीकडे सोशल मीडियावर "वर्च्युअल' मेळा साधला जातो. कांदे नवमीचा हा खवय्यांचा आनंद फेसबुक, व्हिडिओ कॉल, व्हाट्‌सअप, स्टेटस या माध्यमातून लुटण्याचा बेत अनेकांनी ठरवला आहे. सध्या पावसाचे दिवस असून कोसळणाऱ्या पाऊस सरींनी कांदेभजींचा आनंद नक्कीच द्विगुणित होणार आहे. 

आनंद हरवला, उमेद नाही 
वनिता विकास मंडळात आम्ही महिला दरवर्षी कांदे नवमी साजरी करतो. यानिमित्ताने महिलांच्या गप्पा रंगतात. कांदे भजी सोबत जेवण व गप्पांचा आस्वाद घेताना आनंद वाटतो. लॉकडाऊनमुळे यंदा तो हिरावला गेला. मात्र उमेद संपली नाही. पुढील वर्षी तो उल्हासाने साजरा करू. सुरक्षिततेसाठी कांदे भजीची मज्जा यावेळी घरीच घेऊया. 
- डॉ. सुनीता हळदे, वनिता विकास मंडळ, पुसद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT