संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

मेळघाटातील एनजीओ येणार अडचणीत, कामांचे होणार मुल्यमापन

सुधीर भारती

अमरावती : कुपोषण तसेच बालमृत्यूच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मेळघाटातील स्वयंसेवी संस्थांची माहिती गोळा केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्र काढले असून मेळघाटात कार्यरत संस्थांनी त्या कुठल्या कार्यक्षेत्रात काम करताहेत तसेच अन्य माहिती देण्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून कुपोषण तसेच बालमृत्यूमुळे मेळघाट संपूर्ण राज्याला परिचित झालेला आहे. दरवर्षी बालमृत्यू, मातामृत्यूची वाढती संख्या चिंतेचा विषय असतो. मध्यंतरी शासनाकडून घेण्यात आलेल्या माहितीनुसार मेळघाटात ३०५ गावे असून त्यापेक्षा अधिक म्हणजेच ३२५ च्या घरात स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्याचे समोर आले होते. यापैकी चार ते पाच संस्था वगळता अन्य संस्था केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप केला जातो. पर्यायाने शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना योग्य पद्धतीने स्थानिक आदिवासींपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी या संस्थांच्या कामांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

त्यानुसार मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्‍यांत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या कामांचे मूल्यमापन व इतर माहिती घेतली जाणार आहे. ३२५ संस्था मेळघाटमध्ये नोंदणीकृत आहेत, मात्र प्रत्यक्षात कार्यरत संस्थांची माहिती संकलित झालेली नाही. मेळघाट क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी आपले कार्यक्षेत्र, कार्याविषयी, मागील पाच वर्षांत केलेली कामगिरी आदींचा तपशील देण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले आहे. सीईओंच्या या पत्रामुळे केवळ नोंदणी करण्यात आलेल्या संस्थांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. संस्थांनी आपली माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर किंवा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मेळघाटात कार्यरत स्वयंसेवी संस्थांना कार्यासंदर्भात माहिती देण्यास सांगितले आहे. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर शासन तसेच प्रशासनाकडून योजनांबाबत संबंधित संस्थांसोबत काम कशा पद्धतीने करावे हे ठरविण्यात येईल.
-अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती.
 

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT