निकिता राऊत
निकिता राऊत 
विदर्भ

निकिता राऊत सर्वोत्कृष्ट क्रीडापटू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलचा 53 वा वार्षिक पुरस्कार सोहळा रविवार, 1 सप्टेंबर रोजी होणार असून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा कौन्सिलचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली. आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतची शहरातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आली. "सकाळ'चे वरिष्ठ बातमीदार नरेंद्र चोरे यांची जवाहरलाल नेहरू क्रीडा पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
माजी कसोटीपटू सलीम दुराणी यांच्या हस्ते एक तारखेला सायंकाळी पाच वाजता लक्ष्मीनगरात असलेल्या बॅंक ऑफ इंडिया स्टाफ सोसायटी सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होईल. यावेळी वेकोलिचे संचालक (पर्सनल) संजय कुमार विशेष अतिथी असतील. बॅंक ऑफ इंडियाचे श्रीकांत पेंडसे आंतरबॅंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू ठरले असून आरबीआयने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे. बॅंक ऑफ इंडिया उपविजेते ठरले आहेत. याशिवाय क्रिकेटपटू मोहित काळे, नानाभाऊ समर्थ, कॅरमचे पदाधिकारी इक्‍बाल महम्मद, शिक्षक सहकारी बॅंकेचे संजय विंचूरकर, हॅंडबॉलपटू पूनम कडव, माजी महापौर व क्रीडा संघटक कुंदा विजयकर, निरंजन बोबडे, आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरुदास राऊत, आंतरराष्ट्रीय पंच मंगेश मोपकर, बुद्धिबळपटू रौनक साधवानी, क्रिकेटपटू आदित्य सरवटे, धावपटू नागराज खुरसणे आणि प्राजक्ता गोडबोले यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला शरद पाध्ये, चंद्रशेखर कारकर, रवी जोशी, राजेश जोशी, रितेश सैन्नी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT