Nine people have beenNine people have been arrested for gambling in a field in Jamwagadi areaarrested for gambling in a field in Jamwagadi area 
विदर्भ

जामवाघाडीतील जुगारावर पोलिसांचा छापा; नऊ जणांना अटक

सूरज पाटील

यवतमाळ : येथून जवळच असलेल्या जामवाघाडी शिवारात मक्‍त्याने घेतलेल्या शेतात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून नऊ जुगारींना अटक करण्यात आली. सोमवारी (ता.24) यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे जुगारींमध्ये खळबळ उडाली आहे.

भूषण गनडीवार (वय 32), सारंग वानरे (वय 45), सचिन लोहीया (वय 42), चंदन मारोटे (वय 35, सर्व रा. चांदूररेल्वे, जि. अमरावती), फईम कादर अन्सारी (वय 36, रा. घाटंजी), प्रवीण उईके (वय40, रा. भांबराजा), विलास भगत (वय35, रा. आकपुरी), नारायण राठोड (वय 56, रा. अर्जुना), शेख आसीफ शेख चांद (वय 35, रा. पारवा) असे अटकेतील जुगारींची नावे आहेत, तर पोलिसांची चाहूल लागताच विनोद चव्हाण (रा. यवतमाळ) हा पळून गेला. 

गुड्डू पहेलवान याचे शेत विनोद चव्हाण नामक व्यक्तीने मक्‍त्याने घेतले होते. त्या शेतात जुगार भरविला जात होता. ही माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळताच त्यांनी पथकासह खासगी वाहनाने घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरून नऊ जुगारींना अटक केली. एक कार, दोन दुचाकी, रोख रक्कम असा एकूण आठ लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारींविरुद्घ यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
  
परजिल्ह्यातील जुगारींची हजेरी

मक्‍त्याने शेती घेऊन तेथे जुगार भरविण्याचा फंडा चव्हाण नामक व्यक्तीने अवलंबिला होता. या जुगार अड्ड्यावर अमरावती जिल्ह्यातील जुगारींसह घाटंजी, पारवा व परिसरातील जुगारी हजेरी लावायचे. या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ठाकरेंच्या शिलेदारांचा महायुतीशी सामना, मुंबईत दुरंगी सामने अटीतटीचे ठरणार; कोण-कुठे लढणार?

Ruturaj Gaikwad: 'ऋतुराजला संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा विराट आणि रोहित वनडेत...', R Ashwin नेमकं काय म्हणाला?

Election: निवडणूक की सत्तेचा सौदा? मतदारांचा विश्वास तुटतोय, मतदान टक्केवारी कमी होणार? मनपा निवडणुकांपूर्वीच प्रश्नचिन्ह

Angarki Sankashti Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय, भगवान गणेशाच्या आशीर्वादाने संपत्तीत होईल वाढ

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT