नितीन गडकरी
नितीन गडकरी 
विदर्भ

गडकरी यांच्याकडे पुन्हा रस्ते

सकाळवृत्तसेवा

नागपूर : आपल्या कर्तृत्वाने पुलकरी, रोडकरी अशी बिरुदे मिरवणाऱ्या नितीन गडकरी यांच्या नावाला साजेसे तसेच आवडीच्या भूपृष्ठ वाहतूक खात्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांच्यावर सोपविली. संबंधित मंत्र्यांची मागील कार्यकाळातील कामगिरी बघूनच खातेवाटप करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे गडकरी यांच्याकडे पुन्हा रस्ते चालून आले.
राज्यात 1995 साली युतीची सत्ता आली तेव्हापासूनच गडकरी आणि रस्ते एकमेकांना जोडले गेले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना गडकरी यांनी रस्ते व पुलांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदलला. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस हा त्यांच्या काळत झालेला हायवे माइलस्टोन ठरला. त्यांच्या कामाची केंद्रानेही दखल घेतली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना खास दिल्लीत बोलावून घेण्यात आले. त्यातूनच प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जन्माला आली.
मोदी यांचे सरकार आल्यावर ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री झाले. पाच वर्षांत विदर्भच नव्हे तर संपूर्ण देशभर रस्त्यांचे जाळे विणून दाखविले. कोट्यवधींचे रस्ते त्यांनी तयार केले. अनेक रस्त्यांची कामे सुरूच आहेत. यादरम्यान त्यांनी दिवसाची कामाची गतीही वाढविली. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते व पूल अधिक आकर्षक केले. मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना केंद्र सरकारला गडकरी यांना दुसरा पर्याय सापडला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भूपृष्ठ वाहतूक नितीन गडकरी यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT