नितीन गडकरी  
विदर्भ

नितीन गडकरी म्हणाले, महामार्गावर एलईडीचे दिवे लावणार

सकाळ वृत्तसेवा

उमरेड (जि. नागपूर) : नागपूर ते उमरेड हे अंतर चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फक्त अर्ध्या तासात पूर्ण करता येणार आहे. या रस्त्याचे काम करताना पथदिवे एलईडीचे लावण्यात येतील. रस्त्याच्या बाजूला प्रशस्त बसस्टॉप, महिला-पुरुषांसाठी शौचालये व इलेक्‍ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचना दिल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
उमरेड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी (ता. 16) नागपूर-उमरेड, उमरेड-भिवापूर व अन्य रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. सातशे कोटींचा हा चारपदरी मार्ग असून, नियोजित वेळेत काम पूर्ण होणार आहे. उमरेड-भिवापूर या मार्गातही वनविभागाच्या काही अडचणी होत्या; पण त्या दूर झाल्या आहेत. या कामाची सुरुवातही लवकरच होणार आहे, असेही गडकरी म्हणाले.
भंडारा-गोंदिया यांना जोडणाऱ्या आंभोरा पुलाचेही भूमिपूजन झाले. केबलवर हा पूल असून, पुलावर गॅलरी व दोन्ही बाजूंनी जिना राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना पुलावरून वैनगंगेचे दर्शन घेता येईल. उमरेडवरून जाणारा नागपूर-नागभिड ही मीटरगेज रेल्वेलाइन पालकमंत्री बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी ब्रॉडगेज होणार आहे. वर्ध्याजवळील सिंदी येथे ब्रॉडगेज मेट्रोसाठी लागणाऱ्या साहित्याचा कारखाना लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. तसेच गोंदिया ते वर्धा व वर्धा ते रामटेक ही ब्रॉडगेज मेट्रो लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी नागपूर वडसा व्हाया उमरेडवरून जाणार आहे. 120 किमी प्रतितास वेग या गाडीचा राहणार असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले. कार्यक्रमात पूरग्रस्तांना मदत करणारा व पुरातून अनेकांचे जीव वाचविणाऱ्या अमित गजभियेचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT