file photo
file photo 
विदर्भ

नितीन गडकरी म्हणतात, राजकारणात चुकून आलो

सकाळ वृत्तसेवा


नागपूर  : सरकार आपले आहे म्हणून रोजगार अन्‌ तिकीट दोन्ही नेत्यांच्याच मुलांना देणे योग्य नाही. त्यापेक्षा शेतकऱ्यांना रोजगार देण्यावर माझा भर असतो. विदर्भातील महिलांनी गृहउद्योग करावे. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील. मी सामाजिक जाणीव जपणारा माणूस आहे. राजकारणात चुकून आलो असलो तरी हरणारा माणूस नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

श्री महिला गृहउद्योग लिज्जत समूहाच्या येथील शाखेच्या रौप्यमहोत्सवात गडकरी बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार आमदार अनिल सोले उपस्थित होते. गडकरी म्हणाले, देशात 29 टक्‍के रोजगार लघुउद्योग क्षेत्राने निर्माण केला आहे. जेवढी निर्यात होते त्यात 49 टक्‍के वाटा लघुउद्योग क्षेत्राचा आहे. सुमारे 11 कोटी लोक या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या काम करीत असून, अजून पाच कोटी लोकांना रोजगार निर्माण करायचा आहे. भारतात वर्षाकाठी चीनमधून 430 कोटींच्या बांबूची आयात व्हायची. त्यावर तीस टक्‍क्‍यांचा कर लागायचा. आता अरुणाचल येथून बांबू येत असून, यातून देशात सुमारे 25 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

देशातील चारशे रेल्वेस्टेशनवर मातीच्या कुल्लडमध्येच चहा मिळेल इतकी मोठी यंत्रणा निर्माण होत आहे. यामुळे कुंभार व्यावसायिकांचे सक्षमीकरण होणार आहे. तसेच विदर्भातील दुधाचे उत्पादन पाच लाख लिटर असून, ते पंचवीस लाख लिटरपर्यंत नेणार आहे. विदर्भातील उद्यमशील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्‍वासनही दिले. अनिल सोले यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लघुउद्योगांचे योगदान मोलाचे असल्याचे मत व्यक्‍त केले. महापौर नंदा जिचकार यांनी महिलांनी स्वयंरोजगार सुरू करून पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. 

व्यवसाय सामाजिक जाणिवेतून व्हावा 
शहरातून रोज तीस कंटेनर भाज्या दुबईला जात आहेत. आता अमेरिका व जपानमध्ये पाठवायच्या आहेत. व्यवसाय सामाजिक जाणिवेतून झाल्यास यातून असंख्य हातांना रोजगार शक्‍य आहे. मात्र, उत्पादन गुणवत्तापूर्ण असावे याकडे प्रत्येक लघुउद्योजकाने लक्ष द्यावे. सुयोग्य पॅकिंग अन्‌ चांगले मार्केटिंग करावे. मी सदैव सहकार्य करील, असे गडकरी यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: दमदार सुरुवातीनंतर बेंगळुरूने झटपट गमावल्या चार विकेट्स

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT