No bridge for funeral in Buldana District 
विदर्भ

अंत्ययात्रेसाठीही जीव घालावा लागतो धोक्यात

संजय जाधव

बुलडाणा : आय़ुष्यभर खस्ता खाल्लेल्या आपल्या जवळच्या माणसाला किमान शेवटचा निरोप तरी शांत चित्ताने देता यावा, अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते. मात्र, तेही काही माणसांच्या नशिबी नसावे, असे दुर्दैव मलकापुर तालुक्यातील पिंपळखुटा महादेव या गावात पाहायला मिळाले. या गावात जाताना नदी आडवी लागते. या ठिकाणी पूलच नाही. सध्या नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे या गावातील स्मशानभूमीत जाताना लोकांना एकमेकांचा हातात हात घेऊन साखळी करून अत्यंत धोकादायक पद्धतीने नदी ओलांडावी लागत आहे.

दर पावसाळ्यात या गावात हेच चित्र असते. नदीला पूर आला की, गावाचा इतर जगाशी संपर्क तुटतो. त्यामुऴे विद्यार्थी, रुग्ण, कामासाठी बाहेर गावी जाणारे गावकरी या सगळ्यांना पुरातून जाण्याशिवाय पर्याय पर्याय नसतो.

आज (दि.14) पिंपळखुटा येथील शंकरसिंह बाबुराव मोरे (वय ५५) यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर नदीपलिकडच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे ठरले. अंत्ययात्रेसाठी बाहेर गावावरून बरीच मंडळी आलेली होती. इथे दोन नद्यांचा संगम होतो. पावसामुळे या दोन्हीही नद्यांना पुर आला होता. स्मशानभूमी नदीच्या पलिकडच्या काठावर आहे. तिथे शव घेऊन जाणे मोठे जिकरीचे होते. शव तिथपर्यंत कसेबसे पोहोचविण्यात आले. मात्र, बाहेर गावावरून आलेल्या नातेवाईकांना स्मशानभूमीपर्यंत जाता येईना. नदीला मोठा पूर असल्याने तो ओलांडणे कठीण होते. त्यावेळी गावातील तरुणांनी, गावकऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मानवी साखळी तयार केली. आणि अंत्यसंस्कारासाठी आलेल्या महिला, पुरुषांना नदीच्या पलिकडे पोहोचविण्याचे काम केले.

याठिकाणी असलेल्या छोटा पूल पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळे येथे मोठा पूल बांधावा आणि गैरसोय दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांसोबतच आलेल्या पाहुण्यांनीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

Baramati Election: माघार न घेतल्यास काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव अटळ: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शरद पवारांनी काँग्रेसला योग्य सल्ला द्यावा!

IPL 2026: CSK संघ का करतोय मोठा संघर्ष? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनीच सांगितलं खरं कारण; सॅमसनबद्दलही म्हणाले, 'तो अजूनही...

Viral Video: भयानक व्हिडिओ! पनामा कालव्याच्या पुलाजवळ इंधन टँकरचा स्फोट; ४ जण जखमी, एक बेपत्ता

Imran Syed Firing Video : छत्रपती संभाजीनगरात दहशत! शिव्या देत हवेत गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड इम्रान सय्यदचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय करतोय?

SCROLL FOR NEXT