विदर्भ

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम सभापतींविरुद्ध अविश्वास पारित

समीर मगरे

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य सभापतींविरोधात शुक्रवारी (ता. ३) बोलावलेल्या विशेष सभेत अविश्वास पारित झाला. या घटनेने आता जिल्हा परिषदेतील राजकारण अधिक तापणार असण्याची चर्चा आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने शिवसेनेला दूर ठेवून अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. त्यात काँग्रेसला अध्यक्षपद, भाजपला उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतिपद मिळाले होते. तर अपक्षाला शिक्षण व आरोग्य सभापतिपदाची लॉटरिच लागली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीदरम्यान 38 सदस्यांनी तीन सभापतीवर अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांच्यावर निवडणूक प्रचारात सक्रिय होऊ नये, यासाठी अंकुश आणला होता.

आज, शुक्रवारी (ता. ३) या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले.  त्यात बांधकाम सभापती निमिष मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांच्या विरोधात 59 मते पडली, तर शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे (अपक्ष) यांच्या विरोधात 47मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाला. मात्र, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर (काँग्रेस) यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT