गुरुदास राऊतचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना नीलेश भरणे व अन्य मान्यवर. 
विदर्भ

दिव्यांग खेळाडूंना दया नको, संधी हवी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिव्यांग खेळाडू हे काहीच करू शकत नाहीत, असा अनेकांचा गैरसमज आहे. परंतु, त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास, ते अशक्‍य गोष्टही शक्‍य करून दाखवू शकतात. भारतीय दिव्यांग संघाने इंग्लंडमध्ये "वर्ल्ड सीरिज क्रिकेट ट्रॉफी' जिंकून हे सिद्ध करून दाखविले, अशा शब्दांत विजेत्या संघाचा सदस्य गुरुदास राऊत याने आपल्या भावना व्यक्‍त केल्या. गुरुदासचा अपर पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांच्या हस्ते बुधवारी एसजेएएन कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुदास म्हणाला, मी आतापर्यंत अनेक देशांमध्ये क्रिकेट खेळलो. परंतु, वर्ल्ड सीरिजमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून विजेतेपद जिंकणे, ही माझ्यासाठी आनंद व अभिमानाची गोष्ट आहे. या विजयामुळे दिव्यांग क्रिकेटला नवी ओळख मिळून अनेक युवा खेळाडू प्रेरित होतील. तो म्हणाला, स्पर्धेत भारतीय संघ शेवटपर्यंत अपराजित राहिला. दोन सराव सामन्यांसह सर्वच सामने सहज जिंकले. अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडला 36 धावांनी नमवून ऐतिहासिक विजेतेपद मिळविले असले तरी, परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध उपांत्य लढतीत मिळालेला विजय सर्वाधिक आनंद व समाधान देणारा होता.
गुरुदासने विजयाचे श्रेय प्रशिक्षक सुलक्षण कुळकर्णी, बीसीसीआय, राष्ट्रीय व राज्य दिव्यांग क्रिकेट संघटनांसह या खेळाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या सर्वांना दिले. त्याचवेळी थोडी निराशा व समाजाकडून अपेक्षाही व्यक्‍त केली. शहरात दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी हक्‍काचे मैदान नसल्याचे त्याने यावेळी लक्षात आणून दिले. यावेळी नीलेश भरणे, भाजप शहर उपाध्यक्ष भूषण दडवे, राज्य दिव्यांग क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष उत्तम मिश्रा, धनंजय उपासनी व एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. सत्कार समारंभाला नामदेवराव बलगर, सचिव संजय भोसकर, धीरज हरडे, सारंग चाफले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT