संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

मूंग, उडीदाची शेतकऱ्यांकडून नोंदणीच नाही

कृष्णा लोखंडे

अमरावती : खरिपातील पहिले पीक मानले जाणारे मूग व उडदाची शासकीय खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. मात्र एक आठवड्यानंतरही जिल्ह्यातील शासकीय केंद्रांवर एकही शेतकरी फिरकलेला नाही. त्यामुळे शासकीय खरेदीसाठी कोणत्याच केंद्रावर नोंद झाली नसून सुरू करण्यात आलेली जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगची केंद्रे सध्यातरी ओस पडली आहेत.

१५ सप्टेंबरपासून शासनाने मूग व उडदाची नोंदणी करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंगची मोर्शी, चांदूरबाजार, वरुड, अंजनगावसुर्जी, अमरावती व धामणगावरेल्वे तर जिल्हा मार्केटिंगने दर्यापूर, धारणी, तिवसा व चांदूररेल्वे अशी केंद्रे सुरू केलीत. अचलपूर आणि नांदगावखंडेश्‍वर येथील केंद्रांना अद्याप मान्यता आलेली नाही. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या दहा केंद्रांवर एकही शेतकरी फिरकलेला नाही. त्यामुळे शासकीय खरेदीसाठी नोंद झालेली नाही.

यंदा खरिपात ऑगस्ट महिन्यातील संततधार पावसाने मूग व उडदाची वाताहत केली आहे. जिल्ह्यात १५ हजार हेक्‍टर क्षेत्र मुगाखाली तर पाच हजार हेक्‍टर क्षेत्र उडदाखाली आहे. कृषी विभागाच्या कापणी प्रयोगात मुगाचे सरासरी उत्पादन २५ किलो प्रती हेक्‍टर आले आहे. उडदाचीही तीच गत आहे. त्यामुळे यंदा या उत्पादक पट्ट्यातच सरासरी येण्याची शक्‍यता नसल्याने शासकीय केंद्रांवर नोंदणी होईल का?, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान सरकारने मुगाला ७ हजार १९६ तर उडदाला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीदर जाहीर केला आहे. या हमीदराचा शेतकऱ्यांना कितपत लाभ मिळेल असाही प्रश्‍न आहे.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT