file photo 
विदर्भ

रस्ता नाही तर मतदानही नाही ः पिंपळगाववासींचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : राळेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव असे एक गाव आहे, जिथे खड्ड्यात रस्ता शोधायची वेळ आली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, तरीदेखील अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी "रस्ता नाही तर, वोट नाही' असा पवित्रा घेत या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ते, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधा स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर अनेक गावांत पोहोचल्या नाहीत. निवडणुकीत गावविकासाचे गाजर दाखविले जाते. नेते मंडळी गावात येऊन विकासकामांचे आश्‍वासन देतात. मात्र, निवडणूक आटोपली की, पुन्हा पाच वर्षे त्यांचे दर्शन दुर्लभ होऊन जाते. या प्रकाराचा पिंपळगाववासींना चांगलाच वीट आला आहे. राळेगाव तालुक्‍यात येणाऱ्या पिंपळगाव ते सराई येथे ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखल तुडवत शेतात जावे लागते. शेती साहित्य नेता येत नाही. त्यामुळे शेती पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. एकूणच काय तर खड्डा व चिखलातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात चिखलमय रस्त्याची हालत अधिकच खस्ता झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी डांबरी रस्ता झाला नाही, तर एकाही नेत्याला गावात पाय ठेवू देणार नाही. शिवाय रोड नाही तर वोट नाही, असा पवित्रा पिंपळगाव ग्रामस्थांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: राजगडाच्या वाटेवर दुर्दैवी दुर्घटना; पाबे घाटात मिनी बस दरीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू...

Latest Marathi News Update : अयोध्या राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या घरांवर पोलिसांची धाड

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Kolhapur Crime: काेल्हापुरातील पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ पार्लरवर छापा; माजी नगरसेवकावर गुन्हा, साडेचार लाखांची एकवीस मशीन ताब्यात

TET 2026 Paper Leak : त्यांच्याकडे आमदार-खासदार फोडण्याचे कौशल्य; टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर अभिजित दीपकेंची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT