Amravati-Mahanagar-Palika- 
विदर्भ

फेब्रुवारीपासून अमरावती महापालिकेतील कामगार वेतनाविना?

कृष्णा लोखंडे

अमरावती : समान काम समान वेतन, असे धोरण महापालिकेने अंगीकारले आहे. बाह्य संस्थांनी कंत्राट घेत महापालिकेतील आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व अग्निशमन दलात कामगार पुरविले आहेत. दरमहा त्यांचे वेतन महापालिका संस्थेला आरटीजीएसने अदा करते. मात्र कामगारांपर्यंत ते पोहोचत नाही. गेल्या फेब्रुवारीपासून अनेक जणांना वेतन मिळालेले नाही. बाहेर रोजगार नाही व जिथे काम करतात तेथे वेतन नाही, अशी त्यांची व्यथा आहे.

कोरोना संक्रमणाविरोधात लढणाऱ्या कोरोना योद्धांवर आज उपाशी राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेत शिरलेल्या बाह्य संस्थांनी त्यांचे आर्थिक शोषण सुरू केले असून त्यात पालिकेतील अधिकाऱ्यांनीही मोलाचा हातभार लावला आहे. फेब्रुवारीपासून आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व अग्निशमन दलातील कामगारांना वेतन मिळालेले नाही. याशिवाय स्वच्छता विभागातील कंत्राटदारांची देयके अडवून ठेवण्यात आली आहेत.

कोरोना संक्रमणाच्या काळात या कामगारांची लढाई सुरू आहे. स्वच्छता विभागातील कामगार कंटेनमेंट झोनसह बाधित रुग्णांच्या घराजवळ साफसफाई करीत आहेत. आरोग्य विभागातील आशांसह एएनएम व डॉक्‍टर्स या क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षणासह तपासणीत व्यग्र आहेत. याच भागात अग्निशमन दलात काम करणारे रोजंदारी कामगार फवारणीचे काम करीत आहेत, तर शिक्षण विभागातील शिपाई व चपराशी यांनी लॉकडाउनमध्येही शाळा बंद असताना कम्युनिटी किचनमध्ये सेवा दिली. असे असतानाही त्यांना वेतन मात्र फेब्रुवारीपासून मिळालेले नाही.

नागरिकांच्या आरोग्य व पोटापाण्याची काळजी घेणारे हे कोरोना योद्धे महापालिकेतील खाबूगिरीमुळे उपाशी आहेत. त्यांचे कंत्राटदारांकडून आर्थिक शोषण सुरू आहे. लेखा विभागाने देयक अदा केल्याचे सांगितले आहे. कंत्राटदारांना पैसे मिळाले असले तरी कामगारांना मात्र त्यांच्या कामाच्या बदल्यात हक्काच्या पैशांसाठी ताटकळत राहण्याची वेळ कोरोना संक्रमणात आली आहे.

देयके रखडली
स्वच्छता विभागातील कंत्राटदारांची देयके रखडली आहेत. कोरोना संक्रमणात कंत्राटदारांनी कंटेनमेंट झोनसह शहरातील सर्व क्षेत्रांत साफसफाईची कामे केली. त्याची देयके त्यांनी सादर केली, मात्र ती अधिकाऱ्यांच्या टेबलवर पडून आहेत. ती पडून राहण्यामागील कारण शोधण्याची विनंती ज्येष्ठ सदस्य प्रकाश बनसोड, विलास इंगोले, गटनेते चेतन पवार, तुषार भारतीय यांनी केली आहे. काही कंत्राटदारांना दंड करण्यात आला आहे.
 


 

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT