UREA. 
विदर्भ

ऐन हंगामात खताचा तुटवडा? शेतकरी हवालदिल

दिपक खेकारे

गडचांदूर (जि.चंद्रपूर) : कोरपना तालुक्‍यात प्रामुख्याने कपाशीचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी कोरपना तालुक्‍यात 24 हजार 834 हेक्‍टर क्षेत्रात कापूस पीक घेतले जाते. सोयाबीन 4 हजार 468 हेक्‍टर क्षेत्रात आणि 2 हजार 300 हेक्‍टर जमीनीत इतर पिकांची लागवड करण्यात येते. तालुक्‍यातील 38 हजार 539 हेक्‍टर क्षेत्रफळ लागवडी खाली आहे.

सद्यस्थितीत कापूस, तूर, सोयाबीन, पिकाला युरीया खताची आवश्‍यकता असताना नेमका त्याचवेळी युरीया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकरी खताची खरेदी करीत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

हंगाम योग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. लागवड आणि पाऊसही कापूस पिकास पूरक असल्याने सद्यस्थितीत कापूस हंगाम अतिशय भरात आला आहे.
शेतकरी खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जात आहे. मात्र कृषी केंद्र संचालकांकडे युरीया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. स्थानिक कृषी केंद्र संचालकांना विचारणा केली असता, तालुक्‍यात खतांचा पुरवठा कमी झाल्याचे सांगितले.

कृषी अधिकाऱ्यांकडे आकडेवारी नाही
तालुक्‍यात एकूण कृषी केंद्राची संख्या किती? आणि तालुक्‍यतील कृषी केंद्रामध्ये खताचा पुरवठा किती झाला आणि किती साठा उपलब्ध आहे याची माहिती विचारली असता कृषी विभागाकडे ती उपलब्ध नाही. त्यामुळे कृषी विभागाचा कारभार अनागोंदी असल्याचे चित्र सध्या तालुक्‍यात असून कृषी अधिकारी झोपी गेले की काय असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

अनेक कृषी केंद्रातुन जादा दराने विक्री
तालुक्‍यातील अनेक कृषी केंद्रातुन युरिया मिळत नसल्याचे कारणे सांगून युरिया खताची विक्री जादा दराने होत आहे

पिकांना कसे खत द्यायचे
मागील काही दिवसांपासून कोरपना तालुक्‍यात युरीया खताची टंचाई आहे. कृषी केंद्र संचालकांकडे युरीया खत घेण्यासाठी गेल्यानंतर खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मागील काही दिवसांपासून हिच स्थिती असल्यामुळे कापूस पिकांना कसे खत द्यायचे हा प्रश्न आहे.
मनोज भोजेकर
शेतकरी गडचांदूर

पाठपुरावा करणार
खतांच्या पुरवठ्याबाबत शासनाकडे मागणी पत्र पाठवले आहे पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रणित आहिरकर
युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

SCROLL FOR NEXT