विदर्भ

अनोखा छंद : हॉटेलच्या काउंटरवर ४० देशांची नोट गॅलरी

संदीप राऊत

मोझरी (जि. अमरावती) : येथील हॉटेल व्यावसायिक शेख अफसर यांनी एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. जगातील विविध देशांचे चलन संग्रहित करून हॉटेलच्या दर्शनी भागात लावले आहे. यामध्ये एक पैसा ते एक लाख रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. तसेच चलनातून बाद झालेली नाणी अथवा नोटांचेसुद्धा संकलन असून, विविध देशांच्या चलनांची ही आगळीवेगळी नोटगॅलरी पर्यटक कुतूहलाने पाहताना दिसून येतात.

नागपूर-अमरावती महामार्गावर शेख बंधू यांचे हॉटेल आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटक तसेच विदेशवारी करणाऱ्या पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते. साहजिकच आपापल्या देशातील चलन हे प्रत्येकासाठीच महत्त्वाचे असल्याने त्यांचा संग्रह करण्याचा छंद या हॉटेल व्यावसायिकाने जोपासला. सुरुवातीला आपल्याच देशातील व्यवहारातून बाद झालेल्या व नव्याने व्यवहारात चलनात आलेल्या नोटा व नाणी यांचा संग्रह करता करता इतर देशांच्या चलनाविषयी आकर्षक व आवड निर्माण झाली. आज एक दोन नव्हे, तर तब्बल ४० देशांच्या चलनाच्या नोटा व नाणी या छंदवेड्या तरुणाने आपल्या कॅश काउंटरवर सजवून ठेवली आहेत.

या देशांच्या चलनांचा संग्रह

अमेरिकेच्या डॉलरसह फ्रान्सचे फ्रेन्क, इटलीचे लीरा, अर्जेंटिनाचा पेसो, इराकचा दिनार, बांगलादेशचा टका, अफगाणिस्तानचा अफगाणी, चीनचा युआन, रशियाचा रुबल, ब्रह्मदेशचा क्यार, श्रीलंकेचा रुपी, जपानचा येन, दक्षिण आफ्रिकेचा रेंड, ब्राझीलचा रियाल, ब्रिटनचा पौंड, कॅनडाचा डॉलर, कोरियाचा वॉन, पाकिस्तानचा रुपया अशा एक ना अनेक देशांच्या चलनाचा संग्रह येथे पाहायला मिळतो.

आपल्या देशातील एखादी वस्तू आपल्याला परदेशात दिसल्यावर नक्कीच आनंद होतो व अभिमानही वाटतो. ही विविध देशांची चलनं पाहून तोच आनंद येथे येणाऱ्या आणि जगभ्रमण करणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. तेव्हा संग्रह केल्याचे समाधान मिळते.
- शेख अफसर, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT