Amravati News sakal
विदर्भ

Amravati News : माता व बालमृत्यू प्रकरणाची दखल;आरोग्य उपसंचालक धारणीत

धारणी उपजिल्हा रुग्णालयात १४ दिवसांपूर्वी झालेल्या वंदना कासदेकर माता व बालमृत्यू प्रकरणाची आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने विभागीय आयुक्तांच्या निर्देशाने अकोल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. भंडारी हे टीमसह धारणी तालुक्यात दाखल झाले होते. आज (ता.१५) याप्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

धारणी : धारणी उपजिल्हा रुग्णालयात १४ दिवसांपूर्वी झालेल्या वंदना कासदेकर माता व बालमृत्यू प्रकरणाची आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने विभागीय आयुक्तांच्या निर्देशाने अकोल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. भंडारी हे टीमसह धारणी तालुक्यात दाखल झाले होते. आज (ता.१५) याप्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर होणार आहे.

दरम्यान, येथे दाखल झालेल्या आरोग्य विभागाच्या चमूने सर्वप्रथम येथून नजीकच असलेल्या वंदनाच्या पोटीलावा गावात पती दिलीप यांच्यासोबत संवाद साधला व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात सर्व संबंधितांचा चांगलाच क्लास घेतला. धारणी ग्रामीण रुग्णालयात हलगर्जीपणा व वागणुकीमुळे वंदनाचा मृत्यू झाल्याची तक्रार पती दिलीप कासदेकर यांनी पोलिस ठाण्यात केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या नेतृत्वात जिल्हा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरुण सोळंके, अचलपूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांती शिलेदार यांची एसआयटी बनविली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोप असलेल्या डॉक्टरांवर चौकशीअंती कारवाईचे आदेश दिले. तसेच आदेश अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनीदेखील दिले. दरम्यान, हे प्रकरण थेट आरोग्यमंत्र्यांकडे पोहोचल्याने विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डे यांनी याबाबत गंभीर दखल घेत अकोला आरोग्य उपसंचालक डॉ. भंडारी यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार शुक्रवारी (ता.१४) जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालक धारणी तालुक्यात पोहोचले. आरोग्य टीम सर्वांत आधी हरिसाल प्राथमिक आरोग्यकेंद्रात गेली. तेथे वंदनावर उपचार करणारे डॉक्टर व इतर संबंधित यांचे बयाण घेतले. त्यानंतर चमूने वंदनाच्या पोटीलावा गावात पती दिलीप यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार प्रदीप शेवाळे हे देखील हजर होते. दुपारी या टीमने धारणी ग्रामीण रुग्णालयात वंदना कासदेकर प्रकरणी आरोप असलेल्यांचे बयाण घेऊन आरोग्यसेवा अधिक चांगल्याप्रकारे कशी करावी, यबाबत सूचना दिल्या.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य उपसंचालक डॉ. भंडारी आज विभागीय आयुक्तांकडे आपला चौकशी अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त याबाबत कारवाई करून अहवाल शासन व राज्यपाल यांच्याकडे पाठविणार आहेत.

३१ मे रोजी झाला होता मृत्यू

धारणी तालुक्यातील पोटीलावा गावातील वंदना दिलीप कास्देकर (वय २५) या महिलेला ३१ मे २०२४ रोजी प्रसूतीवेदना सुरू झाल्याने त्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या महिलेचा त्याच दिवशी मृत्यू झाला. सोबतच जन्मलेल्या नवजात बालकाचाही मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच महिलेच्या पतीसह कुटुंबातील लोकांनी दवाखान्यातील उपस्थित डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तसेच १ जून २०२४ रोजी धारणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?

IND vs PAK T20 WC: इशान किशनची फटकेबाजी, भारताने उभे केले सर्वात मोठे लक्ष्य; पाकड्यांनी ६ स्पिनर्स वापरले, तरीही...

Mulund: २ कोटींची भरपाई, सरकारी नोकरी अन्...; मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या रामधनींच्या कुटुंबियांच्या मागण्या काय?

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT