file photo 
विदर्भ

ई-सिगारेट पेनहुक्का विकणाऱ्यांना आता लाखोंचा दंड 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कायद्यात तरतूद केल्यामुळे आता सहज उपलब्ध होणाऱ्या ई-सिगारेट, पेनहुक्का विक्री करणाऱ्यांना एक ते पाच लाखांपर्यंत दंड आणि एक ते तीनवर्षांपर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 
ई-सिगरेटमध्ये असलेले निकोटिन आणि ऑर्गेनिक व्होलाटाई सॉल्वल्ट हे आरोग्याला अपायकारक आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरातच नव्हे तर, अमरावती, नागपूर विभागामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर ई-सिगरेट्‌सह पेनहुक्काचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एका विशिष्ट प्रकारच्या फ्लेवरमुळे अनेक शालेय व महाविद्यालयीन मुले त्याच्या विळख्यात सहज ओढले गेले आहेत. शारीरिक व मानसिकरित्या माणसाला कमकुवत करणाऱ्या या वस्तू आतापर्यंत ऑनलाइन पोर्टलवरसुद्धा उपलब्ध होत होत्या. परंतु आता केंद्र शासनाच्या 18 सप्टेंबर 2019 च्या परिपत्रकानुसार या दोन्ही वस्तूंची आयात, निर्यातीसह, अवैध विक्री करणाऱ्यांना कठोर शासन होईल. अवैध विक्री किंवा साठेबाजी करणारा व्यक्ती पहिल्यांदा सापडला तर, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अशा व्यक्तीला एक वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाखापर्यंत दंड होईल. किंवा त्या दोन्ही शिक्षा सोबत होऊ शकतात. हीच चूक त्या व्यक्तीने दुसऱ्यांदा केल्यास त्या व्यक्तीला किमान तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच लाख रुपये दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा सोबतही होऊ शकतात.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : 'आम्ही कुठेही जाणार नाही, सोबत यायचं असेल तर...'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

सचिन तेंडुलकरसोबत होणाऱ्या तुलनेवर विराट कोहलीने मोठा भाष्य केले; म्हणाला, सचिन पाजी हे...

Parbhani News : जन्म-मृत्यू विभागाचा ढिसाळ कारभार उघड;परभणी जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

Pune News: पुण्यात उभे राहणार देशातील पहिले स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र; ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये ८०० कोटींची गुंतवणूक

SCROLL FOR NEXT