विदर्भ

क्या बात है! अडीच लाख अभ्यासक्रमांची माहिती एका क्‍लिकवर; लाखो विद्यार्थ्यांना होणार लाभ

अथर्व महांकाळ

मांजरखेड (जि. अमरावती) : कोरोनामुळे काही बोर्डांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तूर्तास परीक्षा जरी रद्द झाल्या तरी दहावी, बारावीनंतर काय? हा प्रश्न सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना भेडसावत असतो. शिक्षण विभागाने "Mahacareer पोर्टल' विकसित केले असून या माध्यमातून दोन लाख 60 हजार अभ्यासक्रमांची माहिती एकाच क्‍लिकवर उपलब्ध होत आहे.

आजच्या काळानुरूप तरुणांना ज्ञान व जीवन कौशल्याची गरज लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने "महाकरिअर पोर्टल' निर्माण केले आहे. राज्य महामंडळाच्या अनुदानित शाळांतील नववी ते बारावीतील सुमारे 47 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. पोर्टलवर 16 देशांतील सुमारे 2 लक्ष 60 हजार अभ्यासक्रम, 556 करिअर पाथवे तसेच 21 हजार महाविद्यालये, साडेअकराशे प्रवेश परीक्षा, बाराशे पेक्षा जास्त शिष्यवृत्त्या बाबत माहिती दिलेली आहे.

पोर्टलमध्ये करिअर, कॉलेज, परीक्षा डिक्‍शनरी व स्कॉलरशिप, स्पर्धा व फेलोशिप बद्दल विंडो दिलेले आहे. यामध्ये प्रोफेशनल अभ्यासक्रम व वोकेशनल अभ्यासक्रम बद्दल माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे हे पोर्टल दर मिनिटाला अद्यावत होत असल्यामुळे प्रत्येक विषयाची अद्यावत माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

पोर्टलवरील विद्यार्थी प्रवेश

विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या माध्यमातून सरल युनिक आयडी प्राप्त करून हा क्रमांक या पोर्टलचा युजर आयडी म्हणून टाकावा. याचा पासवर्ड एक ते सहा पर्यतचा अंक आहे. या पोर्टल मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतंत्र डॅशबोर्ड राहणार आहे. नोंदणी तथा चौकशी केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे मिळणार आहे.

समुपदेशकाद्वारे मार्गदर्शन

सध्या परीक्षा सोबत कोरोनाचा ताप वाढत असल्याने विद्यार्थी दुहेरी चिंतेत आहेत. त्यामुळे या संदर्भातील कुठलाही ताणतणाव आल्यास किंवा परीक्षा व करिअर संदर्भात कुठलेही मार्गदर्शन हवे असल्यास राज्यात जिल्हानिहाय समुपदेशकांची निवड केलेली आहे. या संदर्भात एससीईआरटीच्या वेबसाइटवर 10 वी व 12 विषय शंका समाधान व समुपदेशकांची यादी उपलब्ध आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT