shivbhojan thali 
विदर्भ

आता दररोज मिळणार 600 शिवभोजन थाळी 

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयांत पोटभर जेवण ही योजना अंमलात आणल्यानंतर जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत थाळींचा लक्षांक दुपटीने वाढवण्यात आला आहे. परिणामी आता जिल्ह्यातील गरीबांना प्रतिदिवशी 600 थाळींचा लाभ घेता येईल. वाढलेला इष्टांक पाहता जिल्ह्यात इतर काही ठिकाणी सुद्धा नव्याने शिवभोजन केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. 


शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपयात जेवण उपलब्ध करून द्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिका क्षेत्रात सध्या दोन ठिकाणी थाळी केंद्र सुरु आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने गत महिन्यात शासन निर्णय जारी करुन जिल्ह्यासाठी 300 थाळींची तरतूद केली होती. परंतु योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे शिवभोजन थाळींची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत दुपारी 12 ते 2 या दोन तास 10 रूपयात भोजन मिळत आहे. 

या ठिकाणी सुरू आहे थाळी केंद्र
गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या महानगरातील सर्वोपचार रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवभोज थाळीची विक्री करण्यात येत आहे. त्यासोबतच शासकीय महिला रुग्णालयात सुद्धा थाळी विक्री केंद्र प्रस्तावित आहे. दरम्यान आता योजनेतंर्गत थाळी वाटपाचा इष्टांक दुप्पट झाल्याने जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुद्धा थाळी विक्री केंद्र वाढण्याची शक्यता आहे.


संस्थेला 40 रुपयांचे अनुदान
शिवभोजन योजनेची थाळी ही ५० रुपयाला असून ही योजना राबविणाऱ्या संस्थेला 40 रुपये अनुदान स्वरूपात सरकार देत आहे. ही योजना तीन महिने प्रायोगिक तत्वावर असून दीर्घ काळ टिकण्यासाठी भविष्यात सामाजिक संस्थांचे योगदान घेतले जाणार आहे. सरकारने तीन महिन्यांसाठी या शिवभोजन योजनेसाठी सहा कोटी 48 लाखांची तरतूद केली होती. परंतु आता त्यात वाढ करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT