file photo 
विदर्भ

आरक्षण तर जाहीर झाले, आता सरपंच बनण्यासाठी गावागावांत चुरस वाढली

संतोष रोकडे

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच सदस्य निवडीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे राजकीय समीकरणात उलथापालथ झाली आहे. तालुक्‍यातील २८ ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी चुरस वाढली आहे. तशी गावागावांत मोर्चेबांधणीलादेखील सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायतस्तरावर राजकीय किंवा प्रादेशिक पक्ष यांच्या नावावर निवडणुका लढविल्या जात नाहीत; तर गावस्तरावरील पॅनेल निवडणुका लढवतात.

या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण सदस्य निवडीनंतर होणार असल्याने निवडणुकीसाठी खर्च कोणी करायचा? आरक्षण कोणाचे निघेल, याची शाश्‍वती नसल्याने बहुतांश उमेदवारांनी स्वबळावर निवडणुका लढविल्या. मात्र, सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर हा माझ्या पक्षाचा असा दावा प्रत्येक राजकीय पक्षांनी केला.


आम्ही ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केली, असेही पुढाऱ्यांकडून सांगितले जात होते. परंतु, वस्तुस्थिती वेगळी होती. २८ जानेवारीला जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने सरपंच कोण तसेच निवडून आलेल्या सदस्यांना एकत्र करून आपल्या गटाचा सरपंच बनविण्यासाठी, बहुमत प्राप्त करण्यासाठी गावागावांत चुरस लागली आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, भरनोली या गटग्रामपंचायतीमधील अकरा गावांतील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि उर्वरित तीन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली. उर्वरित २५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली.

उत्सुकता पोहोचली शिगेला

एकंदरीत तालुक्‍यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये काही दिवसांनंतर सरपंचपदी कोण विराजमान होणार, अशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परिणामी, तालुक्‍यातील वातावरण निवडणुकीनिमित्त व सरपंचपदाच्या आरक्षणानंतर गरमागरम झाले आहे.

राजकीय पक्षांकडून सदस्यांची मनधरणी

विविध प्रवर्गांमधून निवडून आलेले सदस्य आपल्या पॅनेलमध्ये यावेत व आपल्या पॅनेलचे बहुमत सिद्ध करून सरपंच व्हावेत, यासाठी सगळेच राजकीय पक्ष निवडून आलेल्या सदस्यांची मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. काही ठिकाणी पैशाचा, तर काही ठिकाणी पदाची लालसा दाखविली जात आहे. यात अनेकांचा हिरमोडही होत आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT