file photo 
विदर्भ

नासुप्रची 1730 एकर जागा महापालिकेकडे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नासुप्रच्या जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून स्मार्ट सिटी प्रकल्पाची 1730 एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवर आज विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब झाले. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी आता नासुप्रऐवजी महापालिका नियोजन प्राधिकरण राहणार आहे. याशिवाय देशपांडे ले-आउट येथील स्वातंत्र्य सुवर्ण जयंती उद्यान, पारडी येथील लता मंगेशकर उद्यान महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनामार्फत पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, भांडेवाडी, पारडी येथील 1730 एकर परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातील बहुतांश भागाचे नियोजन प्राधिकरण नागपूर सुधार प्रन्यास आहे. मात्र, आता यापुढे स्मार्ट सिटी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण राहील. नासुप्र विश्वस्त मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत नासुप्रच्या सभापती शीतल उगले, मनपा आयुक्त अभिजित बांगर, मनपाचे स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेवक भूषण शिंगणे, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, नगररचना उपसंचालक राजेंद्र लांडे, भांडारकर, गीते उपस्थित होत्या. यावेळी पोहाणे यांनी देशपांडे ले-आउट येथील स्वातंत्र्य सुवर्ण जयंती उद्यान, मौजा पारडी येथील लता मंगेशकर उद्यान नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. बगडगंज उद्यानाचे नवीनीकरण मनपातर्फे करण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर स्वातंत्र्य सुवर्ण जयंती उद्यान, लता मंगेशकर संगीत उद्यान आणि देशपांडे ले-आउट उद्यानाचे नवीनीकरण करण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात यावे, अशी सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT