OBC Reservation sakal
विदर्भ

OBC Reservation : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे ओबीसी आरक्षणाचा एल्गार

ओबीसी समाजाचा न्याय व हक्कासाठी व आरक्षण टिकवण्यासाठी ते कायम राहावे यासह विविध मागण्यासह ओबीसी बांधवांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढून एल्गार करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेड राजा - ओबीसी समाजाचा न्याय व हक्कासाठी व आरक्षण टिकवण्यासाठी ते कायम राहावे यासह विविध मागण्यासह ओबीसी बांधवांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढून एल्गार करण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येत ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

यावेळी राजमाता माँ जिजाऊ राजवाड्यासमोरून हा मोर्चा शहरांतील विविध भागातून निघाला. ओबीसी आरक्षण संदर्भातील घोषणांनी शहर दणाणून गेले होते. यावेळी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांना चिमुकल्या मुलीने व ओबीसी बांधवांनी दिले.

पुढे ओबीसी मोर्चे रूपांतर उपविभागीय विभागीय कार्यालयासमोर असलेल्या सावता भवन येथे सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी ओबीसी आरक्षण बचाव समन्वय समितीचे सदस्य भगवान सातपुते यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देवू नये अशी मागणी करून अंतरवाली सराती येथे ओबीसी नेते छगन भुजबळ यांचेवर अत्यंत खालच्या भाषेत टीका झाली हा प्रकार थांबला पाहिजे, शासनाने आमच्या नेत्यांविरोधात बोलणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली. ओबीसी नेत्यांवरील सातत्याने होणारे आरोप यापूढे सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांचेवर होणारे गलिच्छ आरोप थांबले नाही तर जशास तसे उत्तर द्यायला, आम्ही ओबीसी देखील समर्थ असल्याचे ओबीसी मोर्चाचे समन्वयक संतोष खांडेभराड यांनी यावेळी सांगितले. यावेळी समन्वय समितीचे नागेश गवळी, जनार्दन मेहेत्रे, आकाश मोर्य, पूनम खंदारे यांनी ओबीसी समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले.

विदर्भ, मराठवाडयातून हजारोंचा सहभाग

मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, संभाजीनगर आदी जिल्ह्यांतून शेकडो ओबीसी समाजबांधव या मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. मराठवाड्यात सध्या मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे.

त्यांच्या परवा झालेल्या सभेत छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत झालेल्या टीकेचा आजच्या ओबीसी मोर्चात चांगलाच समाचार घेण्यात आला. दरम्यान, जालना येथून १०० मोटारसायकलवरून २०० ओबीसी कार्यकर्ते मोर्चासाठी आले होते.

मोर्चात महिलांचा मोठा सहभाग

राजवाडा येथून सुरू झालेल्या मोर्चात विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांचा मोठा सहभाग पहावयास मिळाला. देऊळगाव राजा येथील पूनम खंदारे या विद्यार्थिनीने ओबीसी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सांगून सर्वांचेच लक्ष वेचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT