विदर्भ

येणाऱ्या काळात ओबीसी देशातील निर्णायक घटक 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशातील सर्वच धर्मात समाविष्ट असलेला ओबीसी हा सर्व समावेशक घटक आहे. येणाऱ्या काळात ओबीसी देशातील निर्णायक घटक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले. 
राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व युनायटेड स्टुटंड असोसिएशनच्या वतीने दौसर वैश्‍य भवन येथे आयोजित आरक्षण अधिकार परिषदेत ते बोलत होते. परिषदेत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, वायसीसीईचे प्रा. जावेश शेख, महासंघाचे समन्यवक शरद वानखेडे, शहराध्यक्ष प्रा. संजय पन्नासे, त्रिशरण सहारे, स्वागताध्यक्ष शकील पटेल, विद्यार्थी अध्यक्ष नीलेश कोडे, महासचिव रोशन कुंभलकर उपस्थित होते. 
यावेळी नवनियुक्त डॉ. प्रफुल्ल साबळे, प्रा. डॉ. गोपाल झाडे, प्रा. डॉ. गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. जावेद शेख यांनी विद्यार्थ्यांना चौकस राहून अधिकारांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. डॉ. साबळे यांनी कठोर मेहनत आणि ज्ञान संपादन करून आपले प्रभुत्व सिद्ध करण्याचे आवाहन केले. परिषदेच्या माध्यमातून सरकारला जातीनिहाय जनगणना, स्वतंत्र मंत्रालय, वसतिगृहांची निर्मिती, स्वाधार योजना, स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात करणे, खासगी कंपन्यात आरक्षण, जनगणनेनुसार आरक्षण आणि शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या. संचालन नीलेश कोडे यांनी तर विनोद हजारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT