offense against Foreign nationals in amravati
offense against Foreign nationals in amravati 
विदर्भ

विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल; वाचा नेमके काय

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा तीन महिन्यांत टप्याटप्याने शहरात दाखल झालेल्या अठरा विदेशी नागरिकांवर व्हिसाच्या उल्लंघनाचा आरोप आहे. त्या सर्वांना शहरातील एका शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत क्वारंटाइन करण्यात आले.

शहरात दाखल झालेले हे विदेशी नागरिक म्यानमार, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या देशातून शहरात प्रवासी व्हिसावर आले. प्रवासी व्हिसाचा वापर फक्त पर्यटन करून देशातून परत जाण्यासाठी करावा लागतो, असा नियम आहे. परंतु टप्प्या टप्प्यात अमरावती शहरात दाखल झालेल्या या विदेशी नागरिकांनी शहरातील काही भागात धार्मिक ठिकाणी थांबून  उपक्रमात सहभाग घेतल्याची बाब पुढे आली होती. त्यावेळी त्यांची आरोग्य तपासणीसुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली.

त्या सर्वांना 27 मार्चच्या आत आपापल्या देशात परत जायचे होते. परंतु लॉकडाऊनमुळे ते येथे अडकले. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले दस्तऐवज, व्हिसाची चौकशी केली असता, त्यांनी काही तरतुदींचे उल्लंघन केल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपायुक्त शशिकांत सातव यांनी सांगितले. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर त्यांना एकाच ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आल आहे.

"त्या' विदेशींचे स्वॅब घेतले

स्थानिक साबनपुरा येथील मशीदीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे थ्रोब स्वॅब तीन दिवसांपूर्वीच घेण्यात आले. ते तबलिगी जमातशी संबंधित आहेत, संबंधित व्यक्ती विदेशी असल्याची माहिती नव्हती, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मशिदीमध्ये 18 विदेशी नागरिक असल्याची माहिती समोर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT