hatkadi
hatkadi 
विदर्भ

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह पत्नीवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : येथील वनविभागात कार्यरत तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बाबाराव खडतकर यांच्यासह पत्नी विजया खडतकर (रा. सावंगी मेघे) यांच्यावर अपसंपदेचा ठपका ठेवण्यात आला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत हा प्रकार उघड झाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बाबाराव खडतकर सध्या गडचिरोली जिल्ह्यात भामरागड येथे सहायक वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्यात ते 1984 ते 2014 म्हणजेच 30 वर्ष कार्यरत होते. आष्टी, कारंजा, समुद्रपूर आणि वर्ध्याच्या वनविभागात ते कार्यरत होते. वनविभागानंतर काही काळ वर्ध्याच्या सामाजिक वनीकरण विभागात ते होते. येथेच कार्यरत असताना या अधिकाऱ्याने मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या अधिकाऱ्याच्या संपत्तीसंदर्भात 2015 मध्ये तक्रार करण्यात आली होती. यात झालेल्या चौकशीअंती या अधिकाऱ्याकडे मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे दिसून आले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या तक्रारीवरून या खडतकर पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मिळकतीच्या 15.535 टक्‍के अधिक संपत्ती 
बाबाराव खडतकर यांच्याकडे मिळकतीच्या तब्बल 15.535 टक्‍के अधिक संपत्ती असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या पती-पत्नीकडे तब्बल 14 लाख 74 हजार 518 रुपयांची अपसंपदा असल्याचे पुढे आले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT