Officers gave Show cause notice to Workers in Health Department
Officers gave Show cause notice to Workers in Health Department  
विदर्भ

अधिकाऱ्यांकडूनच आरोग्य विभागाचे 'ऑपरेशन'; कर्तव्यात कसूर करणाऱ्या कमचाऱ्यांना शोकॉज

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यात आरोग्य विषयक तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमाचा लाभ नागरिकांना होत आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना तालुका नेमून दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या तालुक्‍यात जाऊन प्रत्यक्ष भेटी देण्याचे आदेश होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत "गौडबंगाल'समोर आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तब्बल 28 कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आले. त्यामुळे या 28 जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत विविध राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येतात. आरोग्य विषयक कार्यक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचविण्याची गरज आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोना आजारात यंत्रणा व्यस्त असल्याने आरोग्यविषयक व इतर कार्यक्रमाची गती मंदावली होती. यात कुटुंब कल्याण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, एन.सी.डी डाटा एन्ट्री, शालेय आरोग्य तपासणी, लसीकरण, ओपीडी आदी कामांचा समावेश होता. या कामांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सूचना दिल्या होत्या. 

तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन तालुके दिले होते. कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटीचा कालबद्ध कार्यक्रमांच्या सूचना होत्या. त्या प्रमाणे अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी गुरुवारी (ता. सात) पुसद तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेबाळपिंप्री, उपकेंद्र इसापूर, कुपटी, पळसी ता. उमरखेड व प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथे भेट दिली. 

प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याची बाब जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या समोर आली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरी, उपकेंद्र मनपूर, किन्ही, रुई येथे भेट दिली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संघर्ष राठोड यांनी उपकेंद्र भोजला ता.पुसद, प्रा.आ.केंद्र जांबबाजार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पवार यांनी उपकेंद्र आमला ता.कळंब व प्रा.आ.केंद्र सावरगाव येथे कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटी दिल्या. या भेटीत आरोग्य विभागातील वस्तुस्थिती समोर आली.

 अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये चार वैद्यकीय अधिकारी, पाच आरोग्य सहायक, चार आरोग्य सेवक पुरुष, दोन औषध निर्माण अधिकारी, चार लिपिक, चार सी.एच.ओ, चार आरोग्य सेविका, एक आरोग्य सहायक महिला गैरहजर आढळून आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची माहिती समोर आली. या तपासणीनंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना 'शोकॉज' देण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे महिनाभराचे वेतन कापणार 

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आकस्मिक तपासणीत 28 आरोग्य कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. या कर्मच्यावर मुख्यालयी न राहणे, खासगी व्यवसाय करणे, कार्यालयीन वेळेत गैरहजर असणे, रेकॉर्ड नोंदीमध्ये तफावती असणे, वेळेवर लसीकरण सत्र न घेणे, कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आले. मुख्यालयी राहत नसलेल्या कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता, खासगी व्यवसाय करणारे वैद्यकीय अधिकारी यांचा एन.पी.ए. भत्ता तसेच एक वेतन वाढ तात्पुरत्या स्वरूपात थांबविणे तसेच समुदाय वैद्यकीय अधिकारी यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्यात आले. तसेच सर्वांनाना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT