digital satbara in buldana.jpg 
विदर्भ

पीक कर्जासाठी बळीराजाची धावपळ...अधिकारी म्हणाले डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा वापरावा

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : तालुक्यात पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले असून, कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीक कर्जाचे वाटप करताना बँकेने व सेवा सहकारी सोसायट्या चालू आहे. त्यासाठी तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा सात-बारा  व 8-अ चा आग्रह न धरता डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा व 8-अ चा वापर करण्याचा आदेश तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर यांनी 14 मे ला दिला.

खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप बँका व सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत सुरू करण्यात आले आहे. पीक कर्जासाठी लागणारा डिजिटल सात बारा व 8- अ हे सी.एस.सी सेंटर आपले सरकार पोर्टल किंवा संग्राम केंद्र याठिकाणी उपलब्ध आहेत. त्याठिकाणी वरून शेतकऱ्यांना घेण्यात यावा. पीक कर्ज करिता नवीन फेरफार प्रतीची मागणी न करता संबधीताकडे उपलब्ध असलेल्या फेरफारच्या प्रतीची पाहणी करून सातबाराशी ताळमेळ घेऊन तीच प्रत ग्राह्य धरण्यात यावी, नवीन छायाकिंत प्रतीची मागणी करू नये.

तसेच बँक सेवा सह सोसायटी यांनी बोजा संबंधित पत्र खातेदार यांचेकडे न देता सदर पत्र हे ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाइन तलाठी यांकडे पाठविण्यात यावा. तीच पोच समजण्यात येईन तलाठी यांनी सदर बोजाची नोंद 1 लाख 60 हजार रुपये मर्यादेपर्यंत सातबाराचा बोजा घेण्याची आवश्यकता नाही असे नाबार्डचे निर्देश आहेत.

या सुविधेचा वापर केल्यास एकाच ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही कोरोना-19 आजाराचे संक्रमण आळा घालता येईल व प्रशासनात गतिमानता येईल. याबाबत आवश्यक ती कारवाई करावी अन्यथा आपल्याविरुद्ध भारती दंगल नियम 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे पत्रामध्ये सांगण्यात आले आहे.

नवीन फेरफार दाखल्याची मागणी करू नका
सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना नवीन फेरफार दाखल्याची मागणी करण्यात येऊ नये, शेतकऱ्यांकडे उपलब्ध फेरफार नोंदीच्या प्रतीची पाहणी करून आणि सात-बाराशी ताळमेळ घेऊन, तीच प्रत ग्राह्य धरण्यात यावी असे निर्देश तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Weather: 'कालबैसाखी’ने नाइट रायडर्सचे टेंशन वाढवले; कोलकाताहून Live अपडेट्स, कट ऑफ टाईम अन् नियम Explain

'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Mumbai News : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण, सेवा किमान महिनाभर ठप्प

Latest Marathi News Live Update: अजूनही निवडणूक बिनविरोध होऊ शकते- चंद्रकांत पाटील

SCROLL FOR NEXT