file photo 
विदर्भ

हे देवा! पुन्हा बोंडअळीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बोंडअळीने यंदाही कापूस पिकावर हल्ला चढविला आहे. काटोल तालुक्‍यात खंबाटा गावात कापसावर बोंडअळी असल्याचे स्पष्ट झाले. पंधरा दिवसांपूर्वी संशोधकांनी येथील नमुने घेतले होते. ती अळी आता बोंडअळीच असल्याचे स्पष्ट झाले.
मागील वर्षीही बोंडअळीने मोठे नुकसान केले होते. यात विदर्भातील शेतकरी देशोधडीला लागला होता. पुन्हा एकदा बोंडअळीने हजेरी लावल्याने शेतकरी भयभीत आहेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेतर्फे म्हणावे तसे प्रयत्न झाले नाही. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात 2.20 लाखांहून अधिक हेक्‍टर क्षेत्रात कापूस लागवड झाली होती. मात्र, या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. एकीकडे अपेक्षित भाव मिळाला नाही आणि दुसरीकडे उत्पन्नही घटल्याने कापूस उत्पादक शेतकरी कोलमडला होता. गतवर्षी जिल्ह्यात 2.17 लाख हेक्‍टरवरच कपाशीची पेरणी झाली होती. त्यातही अनेक गावांतील कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. मात्र, कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना या अळीचा नायनाट करण्यात काही अंशी यश आले होते. यंदा दोन लाख 31 हजार हेक्‍टरमध्ये कापसाची लागवड आहे. पीक चांगले असताना बोंडअळीने हल्ला चढवला. सुरुवातीला लागवड झालेल्या कपाशीच्या पिकास पाते येण्यास सुरुवात झालेली असून, काही भागात बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहे. उशिरा लागवड झालेले कपाशीचे पीक फुलं येण्याच्या अवस्थेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Pune News: थरारक जलक्रीडांनी रंगला ‘रिगाटा महोत्सव’; पुण्यात ९८ वर्षांच्या परंपरेचा जलतिमाही उत्सव, नौकांची धमाल!

Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

SCROLL FOR NEXT