file photo 
विदर्भ

सोनी येथील जुन्या राइसमिलमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका; गावकऱ्यांनी केली इतरत्र हटविण्याची मागणी

डिलेश्वर पंधराम

गोरेगाव (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील सोनी येथे किसान राइस मिल आहे. यापासून परिसरात प्रदूषण होत आहे. त्यातच नवीन राइस मिल कारखाना संचालकाने ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. या मिलपासून नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.

त्यामुळे ही राइस मिल हटविण्यात यावे व नवीन कारखान्यास परवानगी देऊ नये अशी तक्रार गावकऱ्यांनी ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

सोनी ते ठाणा या मुख्य मार्गालगत श्रीकृष्ण गौतम यांची किसान राइस मिल आहे. या राइस मिलला ग्रामपंचायतीने एक ऑक्‍टोबर 1997ला शेतकरी हितासाठी परवानगी दिली होती. परंतु, राइस मिल संचालकाने अटी, शर्तींना डावलून कार्य केले आहे. त्यामुळे धुळीमुळे नागरिकांचे अंग खाजविणे, सर्दी, खोकला, शेती नापिकी होणे, पिण्याचे पाणी दूषित होणे यासारखे दुष्परिणाम जाणवत आहेत. मात्र याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. त्यातच नवीन राइसमिल उभारण्यासाठी संचालक शैलींद्रा श्रीकृष्ण गौतम यांनी ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल केले आहे.

नागरिकांच्या आरोग्यास धोका

किसान राइस मिलच्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून ५०० मीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे नवीन राइसमिल उभारण्यास परवानगी देण्यात येऊ नये, जुन्या राइस मिललाच इतरत्र हटविण्यात यावे. अन्यथा गावकरी आंदोलन, उपोषण करतील, असे निवेदन नरहरी मेश्राम, श्रावण घारपिंडे, डिंगबर कुरंजेकर, अशोक गजभिये, प्रकाश बघेले, योगराज बावनकर, महेंद्र हरिणखेडे, दिनेश खरोले, बिसराम बावनकर, तेजराम घारपिंडे, ताराचंद विंचूरकर, सागर खोब्रागडे, प्रतीक शेंडे यांनी दिले आहे.


परवानगी दिली नाही
सोनी येथे एक 22 वर्षांपूर्वीची राइस मिल आहे. त्याच राइस मिलजवळ नवीन राइस मिल लावण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज आलेला आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार परवानगी दिली नाही, जुन्या राइस मिलला इतरत्र हटविता येत नाही.
- एम. बी. नंदागवळी
प्रशासक, ग्रामपंचायत, सोनी


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Digital Arrest: ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला १९.४५ लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा

Amazon Container Accident: चालकाला डुलकी लागल्याने ॲमेझॉनचा कंटेनर महामार्गावरील खड्ड्यात पलटी; मोठे नुकसान, मोठी दुर्घटना टळली

Manoj Jarange Warning Meet: माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी जोरदार तयारी; विविध समित्यांची स्थापना, मराठा समाजात उत्सुकता

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT