Om Tidke Sakal
विदर्भ

वडील कापड दुकानात नोकरीला, अन् मुलाने गाठले एमबीबीएस

विपरीत परिस्थितीवर आपल्या अथक परिश्रम, जिद्द व सातत्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी थेट निमशासकीय कोट्यातून प्रवेश निश्चित केला.

मुशीरखान कोटकर

विपरीत परिस्थितीवर आपल्या अथक परिश्रम, जिद्द व सातत्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी थेट निमशासकीय कोट्यातून प्रवेश निश्चित केला.

देऊळगावराजा - घरी जेमतेम दोन एकर शेती, आजी शेतात पिकविलेला मालवा भाजी मंडईत विकते, वडील (Father) कापड दुकानात (Cloth Shop) नोकरीला (Job) असल्याने घरची परिस्थिती जेमतेम आहे. अशा विपरीत परिस्थितीवर आपल्या अथक परिश्रम, जिद्द व सातत्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून नीट परीक्षेत (NEET Exam) येथील ओम तिडके (Om Tidke) या विद्यार्थ्याने (Student) कुठलेही अ‍ॅकॅडमी जॉईन न करता ५३९ गुण प्राप्त केले. नुकतेच त्याचा वैद्यकीय अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण अशा एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी (MBBS Medical Education) थेट निमशासकीय कोट्यातून प्रवेश (Admission) निश्चित झाला आहे. घरची परिस्थिती साधारण असताना आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओम याने गाठलेले शैक्षणिक यश हे जिल्ह्यातील शैक्षणिक पंढरी समजल्या जाणार्‍या बालाजी नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

शहरातील अमृतनगर येथे वास्तव्याला असलेले सखाराम तिडके गेल्या २३ वर्षापासून एका कापड दुकानात नोकरीला आहे. घरी दोन एकर शेती आणि कापड दुकानात खासगी नोकरीच्या आधारे मिळणार्‍या अल्प वेतनावर मुलांचे शिक्षण कसे पूर्ण होईल म्हणून त्यांच्या पत्नी यमुना आणि वृद्ध आई शेतात राबराब कष्ट करून माळव पिकवून शहरातील मंडईत विक्री करीत होते. एवढ्या कमी आर्थिक स्त्रोतावर गलेलठ्ठ डोनेशन देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न शक्य नाही याची जाणीव ओम तिडकेला होती. त्याने बारावीत ८५ टक्के गुण प्राप्त करून नीटची तयारी केली.

पहिल्या वर्षी नांदेड येथे अ‍ॅकॅडमी क्लासमध्ये प्रवेश घेऊन ४५६ गुण मिळाले. यावर वैद्यकीय शिक्षणात प्रवेश शक्य नाही म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या देऊळगावराजा हायस्कूलचे शिक्षक प्रभाकर भौरकर, सुनील तिवारी, अविनाश तायडे, सुशील इंगळे, प्रभाकर पडघान व संदीप सस्तीकर यांनी ओम याची शैक्षणिक गुणवत्ता आणि कुटुंबाची असलेली जेमतेम परिस्थिती लक्षात घेऊन त्यास वैयक्तिकरीत्या नेटच्या अभ्यासक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. एक वर्ष वाया गेले म्हणून तो थांबला नाही. कितीही अडथळे आले तरी मला डॉक्टर व्हायचेच हे दिव्य स्वप्न मनाशी बाळगून जिद्दीने त्याने नीट परीक्षेची घरीच तयारी सुरू केली आणि अथक परिश्रम सातत्याने केलेला अभ्यासाच्या जोरावर ५३९ गुण प्राप्त करून नीट परीक्षेत त्याने देदीप्यमान यश संपादन केले. नुकतेच मायमरा मेडिकल कॉलेज पुणे येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ओम सखाराम तिडके याचा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला आहे. सध्या निमशासकीय कोट्यातून झालेला प्रवेश हा पुढच्या यादीत शासकीय कोठ्यात परिवर्तित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT