Nitesh Shinde with Family sakal
विदर्भ

Sangrampur News : उन्हाळ्याच्या दिवसात चिमुकल्या लेकरासह एका कुटूंबाने न्यायासाठी पंचायत समितीच्या दालनात ठाणं मांडलं

वारंवार प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करूनही व एक वेळ आत्मदहनचा इशारा देऊनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप नितेश शिंदे यांनी केला आहे.

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (बुलढाणा) - लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या काही अवधी पूर्वीच संग्रामपुरात (जि. बुलढाणा) पंचायत समितीच्या दालनात एका कुटूंबाने उन्हाळ्याच्या दिवसात चिमुकल्या लेकरासह न्यायासाठी ठाणं मांडलं आहे. राहण्यासाठी घरकुल द्या, अशी या कुटूंबाची मागणी आहे.

वारंवार प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करूनही व एक वेळ आत्मदहनचा इशारा देऊनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप नितेश शिंदे यांनी केला आहे. जागेचा ताबा असतानाही नियमाकूलच्या भानगडीत शिंदे नामक व्यक्ती घरकुलापासून वंचित असावी ही शोकांतिका म्हणावी की काय?

कोद्री या खेड्यातील नितेश महादेव शिंदे यांनी दिलेल्या निवेदन नुसार, मी कुटूंबासह गावठाणच्या जागेत कित्येक वर्षांपासून राहत आहे. माझे घरकुल मंजूर झाले, पण पहिला हप्ता सुद्धा टाकण्यात आला नाही. जागा नावाने नसल्याचे कारण देत सबधितांनी माझे मागणीकडे दुर्लक्ष केले. माझे आजूबाजूने राहणाऱ्या लोकांना घरकुलचा लाभ मिळाला, पैसे ही मिळाले, मग मलाच का वंचित ठेवल जात आहे.

अश्या मागणीला घेऊन शिंदे यांनी 11 मार्चला पंचायत समितीमध्ये येऊन गटविकास अधिकारी यांच्या दालनाच्या समोर व्हरांड्यातच लहान मुलाला घेऊन कुटुंबासह ठिय्या मांडल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. या अचानकच्या आंदोलनाची चांगलीच चर्चा होत आहे. लोकसभेच्या पूर्व तयारीत सर्वच पक्षाचे नेते व पदाधिकारी व्यस्त असल्याने या आंदोलक कुटूंबाला न्याय मिळेल की नाही, याची ही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान; भाजपची आज देशभरात निदर्शने

Aaditya Thackeray: हिंजवडीसाठी निधी मंजूर, तरीही कामे ठप्प; समस्यांबाबत आमदार आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

Gokul Chairman Election Latest News : 'गोकुळ'चा अध्यक्ष आमचाच होणार! तांत्रिक मुद्द्यांवर महायुतीचे नेते अडथळा आणणार नाहीत; सतेज पाटील यांचा मोठा दावा

'एकही वर्ष गेलेलं नाही, ज्या वर्षी मी काम केलं नाही' सचिन पिळगांवकर नेहमी स्वतःचंच उदाहरण का देतात? स्वत: सांगितलं कारण, म्हणाले…

Ambabai Temple Donations : अंबाबाई चरणी 20 लाखांचे सोने, 44 लाखांची चांदी; नवरात्रोत्सवात भाविकांकडून भरभरून दान, 36 लाखांवर रक्कमही खजिन्यात

SCROLL FOR NEXT