file photo 
विदर्भ

परवानगी नसताना गोंदियात एक कोटीचा रासायनिक-जैविक खतांचा केला साठा...मग पोलिसांनी...

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : तुमखेडा मिलटोली येथील सीतापेठी राइसमिलच्या गोदामात रासायनिक व जैविक खतांचा साठा केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली.

या माहितीवरून पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे आणि पथक तसेच जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक बाळासाहेब गिरी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोहर मुंढे यांनी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या सीतापेठी राइसमिल येथे असलेल्या गोदामाची तपासणी केली.

तुमखेडा मिलटोली येथील सीतापेठी राइसमिल येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत 1 कोटी 28 लाख 78 हजार 796 रुपयांचा रासायनिक तसेच जैविक खतांचा साठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (ता. 18) दुपारी 1 च्या सुमारास केली.


खते विक्री परवान्याची तपासणी

या तपासणीत 6465.20 क्विंटल रासायनिक खते व 5030 लिटर जैविक खते, असा एकूण 1 कोटी 28 लाख 78 हजार 796 रुपयांचा खतांचा साठा आढळून आला. दरम्यान, पोलिस पथकाने विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या खते विक्री परवान्याची तपासणी केली असता, गोदाम परवान्यात समाविष्ट नसल्याचे आढळले. गोदामाचे ठिकाण परवान्यात समाविष्ट नसताना रासायनिक खतांची साठवणूक केल्याने खते ताब्यात घेऊन गोदाम सील करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पोलिस कर्मचारी सुखदेव राऊत, विजय रहांगडाले, लिलेंद्रसिंह बैस, गोपाल कापगते, चंद्रकांत करपे, भूमेश्‍वर जगनाडे, रेखलाल गौतम, अजय रहांगडाले, पुरणलाल पटले, विनोद गौतम, विनोद हरिणखेडे व कृषी विभागाने केली.

गोदाम सील करून मागविला खुलासा

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करीत गोदाम सील केले आहे. त्यानंतर विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला विक्रीबंद आदेश देऊन खुलासा सादर करण्याबाबत 20 जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची भव्य मॉक ड्रिल; विविध यंत्रणांचा समन्वय आणि सज्जतेची यशस्वी चाचणी

SCROLL FOR NEXT