accident
accident 
विदर्भ

रिधोराजवळ अपघातात एक जण जागीच ठार 

अनिल दंदी

अकोला : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेला आयशर ट्रक समोरील वाहनावर आदळून झालेल्या भीषण अपघातात कार मधील चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.
ही अपघाताची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कलकत्ता ढाब्या जवळ काल रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास रिधोरा नजीक घडली.

बाळापूर येथील उमाळे कूटूंबीय अकोला येथून बाळापूर करीता एम एच १४ एफ जी ९५१९ या वाहनाने निघाले होते. दरम्यान सदर वाहन रिधोरा जवळील कलकत्ता ढाब्या जवळ पोचताच समोरुन येणाऱ्या आयशर क्र. एमएच ०५ डि के ०९६० या ट्रकने धडक दिल्याने विचित्र अपघाताची घटना घडली. त्यामुळे कार मधील सचिन उमाळे वय (३५) हा चालक जागीच ठार झाला. व वाहनातील अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे बिट जमादार राजेश सोळंके, वाहतूक पोलीस कर्मचारी शिंदे, गजानन देशमुख हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

महामार्ग मदत पथकाचे मदतकार्य
रिधोरा येथील अपघात मदत केन्द्राचे प्रमुख व पोलीस पाटील सुजय देशमुख व त्यांच्या सदस्यांनी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून मदतकार्य राबविले. या प्रकरणी आयशर चालक रामपाल गुप्ता रा. मुंबई याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आयशर मुंबई हुन जबलपूर कडे जात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT