Yavatmal  sakal
विदर्भ

Yavatmal : शेतात शॉक लागून एकाचा मृत्यू

शेतीला लागून दुसऱ्याची शेती असणाऱ्याने त्याच्या शेतातील कंपाउंडमध्ये विजेचा प्रवाह सोडला होता.

सकाळ वृत्तसेवा

उमरखेड (जि. यवतमाळ) : शेतीला लागून दुसऱ्याची शेती असणाऱ्याने त्याच्या शेतातील कंपाउंडमध्ये विजेचा प्रवाह सोडला होता. या प्रवाहाच्या संपर्कात येऊन शेजारील शेतीच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२२) सायंकाळी तालुक्यातील बिटरगाव (खु.) येथे घडली.

सुमेध धर्मपाल गवळे (वय३१, रा. भगतसिंग वार्ड, उमरखेड) असे मृताचे नाव आहे. तो शनिवारी सायंकाळी मोटरसायकलवर आपल्या आईला घेऊन बिटरगाव (खु.) येथील शेत शिवारात बी बियाणे, खते घेऊन जात होता. दरम्यान पावसाला सुरवात झाल्यानंतर मोटरसायकल ही रस्त्यावर फसली. त्यामुळे त्याने जवळील धोंडबा बोंढारे यांच्या शेतात बी बियाणे, खते ठेवण्यासाठी गेला. मात्र, धोंडबा बोंढारे यांनी त्यांच्या उसाच्या शेतीत रानडुकरांचा त्रास होत असल्याने तार कुंपणावर वीजप्रवाह सोडला होता. सुमेधचा ह्या तारांना स्पर्श होताच त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान रविवारी (ता.२३) सकाळी मृताच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यावर जमावासह धडक दिली. शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडणाऱ्या धोंडबा बोंढारे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली होती.

करून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन होऊ देणार नाही, ही भूमिका घेतल्याने उमखेड पोलिसांनी मृताचे वडील धम्मपाल गवळे यांच्या तक्रारीवरून धोंडबा बोंढारे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर नातेवाइकांनी शवविच्छेदनाला परवानगी देऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सरदार हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamilnadu Government: तामिळनाडूमध्ये AI साठी स्वतंत्र मंत्रालय! खातेवाटप जाहीर, मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Appa Mahadik Anandrao Patil : महादेवराव महाडिकांनी आनंदराव पाटलांचा अपमान केला होता का?; महाडिक गटाकडून खुलासा; गोकुळवरून राजकारण तापलं

Manoj Jarange: मराठा आंदोलनाला नवे वळण! मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ? निकटवर्तीयाविरोधात ED आणि आयकर विभागाकडे तक्रार

यूपी निवडणुकीसाठी कॉकरोच जनता पार्टीला पहिला उमेदवार मिळाला; थेट मुस्लिम आमदारांनी CJP मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला

IPL 2026 : "हार्दिक पांड्यामुळे Mumbai Indians मधील वातावरण बिघडलं, रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्याची गरज..."

SCROLL FOR NEXT