naxal Sakal
विदर्भ

गडचिरोली : पोलिस - नक्षल चकमकीत एक जवान जखमी

भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्र अंतर्गत असलेल्या जंगल परिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात आज (ता. ३) सकाळच्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यात उडालेल्या चकमकीत एक पोलिस जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार पोलिस दलाच्या सी-६० पथकाचे पोलिस जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस जवानांवर अचानक अंधाधुंद गोळीबार केला पोलिसांनीही नक्षल्याना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात एक पोलिस जवान जखमी झाला असून जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.

घटनास्थळी काही नक्षल्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी नक्षल्यांचे मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत करण्यात पोलिस जवानाना यश आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आले असून सर्चींग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले. यासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख यांना विचारले असता अभियान अद्याप सुरूच असून संपूर्ण माहिती मिळताच कळविण्यात येईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज; परस्पर भेटीचा निर्णय घेतल्याने केली विचारणा

रजत पाटीदार कर्णधार, रिंकू सिंगकडे उप कर्णधारपद; मोठ्या स्पर्धेसाठी जाहीर झाला तगडा संघ... नेमक्या केव्हा होणार या लढती?

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी बातमी; RBIच्या योजनेने आणले ४०.८१ अब्ज डॉलर; एका निर्णयाने बदललं चित्र

Latest Marathi News Live Update : जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्याच्या गर्लफ्रेंडला अटक, नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा होता डाव

अयोध्या हादरली! मेडिकल कॉलेजच्या 'एक्स-रे रूम'मध्ये सापडला बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला; तीन जण ताब्यात

SCROLL FOR NEXT