विदर्भ

नववर्षाची पार्टी जीवावर बेतली; अपघातात एक ठार, एक जखमी

सकाळ वृत्तसेवा

वणी : वर्षाच्या शेवटच्या दिवशी नववर्षाचा(new year celebration ) जल्लोष करण्यासाठी गावावरून शहरात आलेल्या युवकाच्या दुचाकीला अपघात झाल्याने 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक युवक जखमी झाला आहे.( One killed, one injured in the accident for celebrate new year party)

निखिल गजानन बोढे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो तालुक्यातील मंदर येथील रहिवासी आहे. काल शनिवारी (ता.31) निखिल व प्रफुल बोढे हे दोघे चुलत भाऊ मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व जल्लोष करण्यासाठी दुचाकीने वणी आले होते. येथील एका हॉटेलमध्ये पार्टी करून रात्री उशिरा ते दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाले. घुग्गूस मार्गावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. निखिलला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर प्रफुल्ल जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मावळत्या वर्षात युवकाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT