crime
crime 
विदर्भ

करणी केल्याच्या संशयाची परिणीती झाली हत्येत!

योगेश वरभे

अल्लीपूर (जि.वर्धा) : करणी आणि जादुटोणा या गोष्टींचा प्रभाव आजही समाजात दिसतो. याविषयी कितीही जनजागृती करण्याचा प्रयास झाला तरी हे प्रकार आजही सर्रास चालू असतात. अनेकांचे जीव जायला या गोष्टी कारणीभूत ठरतात. अशीच घटना नुकतीच वर्धा जिल्ह्यात घडली. करणीच्या निव्वळ संशयावरून एकाने दुसऱ्याचा जीवच घेतला.

सोनेगाव (खुनकर) येथील गजानन आडे यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला. ही घटना 16 जुलै 2020 रोजी घडली. ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तपास केला असता हा खून गावातील देविदास मारोती कुमरे याने केल्याचे लक्षात आले. त्याला अटक करण्यात आली असून त्यानेखून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली.

अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोनेगाव येथे गजानन आडे हा पिक राखणीसाठी शेतात गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळून आला. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी मृतदेहाशेजारी एक रक्‍ताने माखलेली काठी होती. यामुळे हा प्रकार खुनाचा असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेतला असता संशयावरून देविदास कुमरे याला ताब्यात घेण्यात आले. त्याला ताब्यात घेताच त्याने खुनाची कबुली दिली. गजानन याने आरोपीच्या पत्नीवर आणि मुलावर करणी केल्याचा संशय असल्याने त्याचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, नरेंद्र डहाके, संतोष दरगुडे, गजानन लामसे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

हत्येनंतर गावात फिरत होता आरोपी
हत्या करून गावातून पळून जाण्याऐवजी देविदास गावातच फिरत होता. या प्रकरणात त्याचा संशय आल्याने देविदासला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेताच त्याने हत्येची कबुली दिली. असे पोलिसांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या निधनाची पसरवली खोटी बातमी, जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

T20 World Cupमध्ये कॅरिबियन तडाखा! निकोलस पूरनचा 'अग्नि तांडव', एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 36 धावा, Video Viral

Women’s Health : शारिरीक तंदूरूस्तीसाठी महिलांनी तिशीनंतर 'या' सुपरफूड्सचा आहारात करावा समावेश

'रवी राणांमुळेच नवनीत राणांचा पराभव, त्या सतत TV वर दिसायच्या म्हणून..'; बच्चू कडूंचा खबळजनक दावा

Share Market Today: शेअर बाजारात जोरदार सुरुवात होण्याची शक्यता; कोणत्या शेअर्सवर ठेवा लक्ष?

SCROLL FOR NEXT