file photo 
विदर्भ

अडीच लाखांचा मोह आला अंगलट; बसला ऑनलाइन फटका

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : लॉटरी लागल्याची बतावणी करून आर्थिक लुबाडणुकीच्या घटना सतत घडत आहेत. त्याला ग्रामीण भागातील लोक बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांत तिसऱ्या व्यक्तीची फसवणूक झाली. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना नागरिकही पाहिजे त्या प्रमाणात जागरूक नसल्याचे दिसून येत आहे. 

प्रमोद रामराव खडसे (वय 47, रा. खेड, ता. मोर्शी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना तोतयाने 57 हजार रुपये दिलेल्या खात्यावर ऑनलाइन भरण्यास सांगून लुबाडले. ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी दोन क्रमांकाच्या सिम कार्ड धारकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. श्री. खडसे यांना 29 मे रोजी एका मोबाईलवरून फोन आला. संपर्क करणाऱ्याने केबीसीकडून अडीच लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी केली. त्यानंतर खडसे यांना त्यांच्या व्हॉट्‌ऍपवर एक बॅंकेचा खाते क्रमांक पाठविला. त्यावर 29 ते 31 मे या दोन दिवसांत विविध कारणे सांगून ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितले. 

खडसे यांनी अनोळखी मोबाईल धारकाने सांगितल्याप्रमाणे आदेश पाळले. त्यानंतर त्या मोबाईल धारकाने मोबाईल स्विच ऑफ केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खडसे यांनी पोलिसांत तक्रार केली. चोवीस तासांपूर्वी ग्रामीण भागातील एक टेलर व युवक अशा दोघांना याच पद्धतीने लुबाडले गेले होते. अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नये, असे वारंवार आवाहन करूनसुद्धा नागरिक तोतयांच्या आमिषाला बळी पडत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

Mumbai News: 'लालबागचा राजा'च्या दरबारात दुर्दैवी घटना! मंडपाजवळ ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'कोण होणार करोडपती' साठी डिझायनर साडीऐवजी पैठणीच का नेसली? माधुरी दीक्षितने दिलं खरं उत्तर, म्हणते-

Maharashtra Ganesh Visarjan Live: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गणरायाला भक्तिभावाने वाजतगाजत निरोप

Mukhyamantri Vayoshri Yojana : ‘वयोश्री योजने’चा थकलेल्या हातांना मोठा आधार जिल्ह्यात १७ हजार ज्येष्ठांना लाभ; प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग

SCROLL FOR NEXT